मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचं पन्हं

Photo of Kairiche Panhe / Aam Panha by Sudha Kunkalienkar at BetterButter
736
0
0.0(0)
0

कैरीचं पन्हं

Jun-12-2018
Sudha Kunkalienkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचं पन्हं कृती बद्दल

कैरीचं पन्हं वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलं जातं. मी माझ्या आईची रेसिपी वापरते. कोकणात पन्हं बनवताना त्यात किंचित हिरवी मिरची घालतात. फक्त चवीपुरती. मस्त चविष्ट पन्हं होतं. आणि मी गूळ घालते. मग शुगरफ्री मिरचीच्या स्वादाचे पन्हं करून पाहणार ना ?

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. कैरी मध्यम १
  2. चिरलेला गूळ साधारण कैरीच्या गराएवढा 
  3. मिरचीचा छोटा तुकडा 
  4. मीठ चवीनुसार 
  5. वेलची पूड पाव चमचा 
  6. केशर २-३ काड्या 

सूचना

  1. कैरी धुवून, साल काढून प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या. 
  2. गार झाल्यावर गर काढा. 
  3. मिक्सर च्या भांड्यात कैरीचा गर, गूळ, मीठ आणि मिरची घाला आणि अगदी बारीक पेस्ट करून घ्या. हवे असल्यास पाणी घाला. 
  4. कैरीला शीरा असतील तर मिश्रण गाळून घ्या नाहीतर वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये ओता. 
  5. हवा असल्यास आणि गूळ घाला. 
  6. पाणी घालून पन्हं जेवढे पातळ हवे असेल तेवढे करा.  वेलची पूड आणि केशर घालून फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा. 
  7. थंडगार पन्हं सर्व्ह करा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर