आंध्र स्टाईल स्वीट करजुरा | Andhra Style Sweet Karjura Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Andhra Style Sweet Karjura recipe in Marathi,आंध्र स्टाईल स्वीट करजुरा, Deepa Gad
आंध्र स्टाईल स्वीट करजुराby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

आंध्र स्टाईल स्वीट करजुरा recipe

आंध्र स्टाईल स्वीट करजुरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Andhra Style Sweet Karjura Recipe in Marathi )

 • मैदा २०० ग्राम (अडीज कप)
 • साखर १५० ग्राम (पावणेदोन कप)
 • बटर/तूप ३० ग्राम
 • बेकिंग पावडर १/४ च
 • खायचा सोडा चिमुटभर
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • बदामाचे काप २ च

आंध्र स्टाईल स्वीट करजुरा | How to make Andhra Style Sweet Karjura Recipe in Marathi

 1. मैदा, बेकिंग पावडर, खायचा सोडा सर्व चाळुून घ्या
 2. त्यात बटर किंवा तूप गरम करून घाला
 3. सर्व हाताने चोळून एकजीव करा
 4. पाणी हवे तेवढे घालून मळा (जास्त घट्ट नको की एकदम मऊ नको, मध्यम होईल असं मळा) झाकून ठेवा तोपर्यंत
 5. एकीकडे कढईत तेल तापत ठेवा
 6. दुसरीकडे साखरेत १ कप पाणी घालुन एकतारी पाक करायला गॅसवर ठेवा
 7. मळलेल्या पिठाचे २-४ भाग करा व त्याचे लांबट गोळे करा
 8. एक इंचाचे सुरीने तुकडे करा
 9. तापलेल्या तेलात कापलेले गोळे तसेच टाका व चांगले खरपूस भाजा
 10. लालसर झाले की गरम पाकात टाका
 11. थोडावेळ मुरले की बॉउलमध्ये काढुन वरून बदामाचे काप घालून सर्व्ह करा

My Tip:

बटर चे मोहन मैद्याच्या मिश्रणात घातल्या नंतर हाताने व्यवस्थित चोळून घ्या मगच पाणी घालून मळा म्हणजे छान क्रिस्पि होतात

Reviews for Andhra Style Sweet Karjura Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo