मुख्यपृष्ठ / पाककृती / रेस्टॉरंट स्टाईल पनीर

Photo of Restaurant Style Paneer by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
921
5
0.0(0)
0

रेस्टॉरंट स्टाईल पनीर

Jun-14-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेस्टॉरंट स्टाईल पनीर कृती बद्दल

माझी ही रेसिपी खूप पटकन होणारी पण अतिशय सुंदर अशी आहे। आमच्या कडे काही पार्टी वगैरे असली की सगळ्यांची खास करुन लहान मुलांची फरमाईश असते की मी हीच भाजी बनवावी। अण जेव्हा ती मुलं साँगतात की काकू पनीर खूप यम्मी झालंय तर मला खूप आनंद होतो।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्राम पनीर
  2. २ च़टक लाल टमाटे
  3. १ कांदा
  4. ६-७ लसूण
  5. १" आलं
  6. १ टीस्पून कसूरी मेथी
  7. १ टीस्पून किचन किंग मसाला
  8. १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  9. मीठ
  10. १ टीस्पून साखर
  11. तेल / बटर (मी तेल वापरते)
  12. जी़रे
  13. १ मोठी इलायची
  14. १ टेस्पून क्रीम

सूचना

  1. टमाटे, अर्धा कांदा, लसूण, आलं सगळं एकत्र वाटून घ्या।
  2. कढईत तेल/बटर तापवून त्यात जीरं, मोठी इलायची टाका।
  3. उरलेला अर्धा कांदा बारीक चिरून तेलात घाला। छान परतून घ्या।
  4. आता वाटण, कसूरी मेथी, कीचन किंग मसाला घालून मंद आचेवर ५-७ मिनटे परतावे।
  5. आता काश्मिरी लाल तिखट आणि पनीर चे क्यूब्स घालून परतावे।
  6. मीठ, साखर, क्रीम आणि थोडं पाणी घालून मिक्स करावे। २मिनिटात गैस बंद करावे।
  7. गरम पनीर तूप लावलेल्या पोळ्यान सोबत सर्व्ह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर