फोडशी ची / मुळशीची भाजी | Phodshichi / Mulshichi Bhaaji (bhaji) Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Phodshichi / Mulshichi Bhaaji (bhaji) recipe in Marathi,फोडशी ची / मुळशीची भाजी, Sudha Kunkalienkar
फोडशी ची / मुळशीची भाजीby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

फोडशी ची / मुळशीची भाजी recipe

फोडशी ची / मुळशीची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Phodshichi / Mulshichi Bhaaji (bhaji) Recipe in Marathi )

 • फोडशीच्या जुड्या ३ (चिरलेली भाजी  अडीच कप )
 • कांदे २ मध्यम 
 • ठेचलेली लसूण ५-६ पाकळ्या 
 • ठेचलेली मिरची अर्धा चमचा 
 • खवलेला नारळ १-२ मोठे चमचे 
 • साखर १ चमचा 
 • मीठ चवीनुसार 
 • फोडणीसाठी
 • तेल १ चमचा
 • मोहरी पाव चमचा 
 • हिंग १ चिमूट 
 • हळद पाव चमचा

फोडशी ची / मुळशीची भाजी | How to make Phodshichi / Mulshichi Bhaaji (bhaji) Recipe in Marathi

 1. भाजी धुवून बारीक चिरून घ्या. भाजीचा हिरवा आणि पांढरा भाग दोन्ही घ्यायचे. 
 2. कढईत तेल गरम करून मोहरी, हळद , हिंग घाला.  मिरची आणि लसूण घालून १ मिनिट परता. 
 3. कांदा घालून २-३ मिनिटे परता . 
 4. चिरलेली भाजी घाला. झाकण ठेवून शिजवा. पाणी लागत नाही. अगदी सुकी वाटली तर थोडे पाणी शिंपडा. फार जास्त शिजवू नका. 
 5. साखर, मीठ आणि नारळ घालून एकत्र करा. २ मिनिटं शिजवा आणि गॅस बंद करा. भाजी तयार आहे. 
 6. पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. खूप छान लागते.  

Reviews for Phodshichi / Mulshichi Bhaaji (bhaji) Recipe in Marathi (0)