BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडशी ची / मुळशीची भाजी

Photo of Phodshichi / Mulshichi Bhaaji (bhaji) by Sudha Kunkalienkar at BetterButter
0
0
0(0)
0

फोडशी ची / मुळशीची भाजी

Jun-14-2018
Sudha Kunkalienkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडशी ची / मुळशीची भाजी कृती बद्दल

ही पालेभाजी फक्त पावसाळ्यात मिळते. मी काल पहिल्यांदाच बनवली. चव छान लागली आणि बनवायला अगदी सोपी आहे. खाल्ली नसेल तर ह्या पावसाळ्यात नक्की करून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. फोडशीच्या जुड्या ३ (चिरलेली भाजी  अडीच कप )
  2. कांदे २ मध्यम 
  3. ठेचलेली लसूण ५-६ पाकळ्या 
  4. ठेचलेली मिरची अर्धा चमचा 
  5. खवलेला नारळ १-२ मोठे चमचे 
  6. साखर १ चमचा 
  7. मीठ चवीनुसार 
  8. फोडणीसाठी
  9. तेल १ चमचा
  10. मोहरी पाव चमचा 
  11. हिंग १ चिमूट 
  12. हळद पाव चमचा

सूचना

  1. भाजी धुवून बारीक चिरून घ्या. भाजीचा हिरवा आणि पांढरा भाग दोन्ही घ्यायचे. 
  2. कढईत तेल गरम करून मोहरी, हळद , हिंग घाला.  मिरची आणि लसूण घालून १ मिनिट परता. 
  3. कांदा घालून २-३ मिनिटे परता . 
  4. चिरलेली भाजी घाला. झाकण ठेवून शिजवा. पाणी लागत नाही. अगदी सुकी वाटली तर थोडे पाणी शिंपडा. फार जास्त शिजवू नका. 
  5. साखर, मीठ आणि नारळ घालून एकत्र करा. २ मिनिटं शिजवा आणि गॅस बंद करा. भाजी तयार आहे. 
  6. पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. खूप छान लागते.  

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर