मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लॉवर बदामाचे सूप

Photo of Cauliflower Almond Soup by Sudha Kunkalienkar at BetterButter
628
0
0.0(0)
0

फ्लॉवर बदामाचे सूप

Jun-15-2018
Sudha Kunkalienkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लॉवर बदामाचे सूप कृती बद्दल

फ्लॉवर बदामाचे सूप ही माझी स्वतः ची रेसिपी आहे. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून आणि कॉर्न फ्लोअर न वापरता हे दाट, स्वादिष्ट आणि पौष्टिक सूप बनवलं आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • मायक्रोवेवींग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कॉलीफ्लॉवर चे तुरे दीड कप
  2. कोथिंबीर अर्धा कप
  3. तूप / बटर अर्धा चमचा
  4. लसूण ५-६ पाकळ्या
  5. काळी मिरी पावडर चवीनुसार
  6. बदामाची पावडर २ मोठे चमचे
  7. बदाम ८-१० सजावटीसाठी
  8. काळं मीठ चवीनुसार

सूचना

  1. कोथिंबीर मिक्सर मध्ये घालून पेस्टबनवून घ्या
  2. बदामाचे काप करून २ मिनिटे मंदआचेवर भाजून घ्या
  3. कॉलीफ्लॉवर चे तुरे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ४ मिनिटे वाफवून घ्या. जास्त शिजवूनका. मऊ झाले की थांबा .
  4. थंड करून मिक्सर मध्ये पेस्ट करूनघ्या.
  5. एका पातेल्यात कोथिंबीर आणिकॉलीफ्लॉवर ची पेस्ट घाला. काळं मीठघाला. जरुरीप्रमाणे पाणी घालूनमिश्रणाला उकळी आणा.
  6. काळी मिरी पावडर आणि बदामाचीपावडर घालून परत एक उकळी आणा.
  7. एका छोट्या कढईत तूप गरम करूनलसणाचे तुकडे लालसर होईपर्यंत तळाआणि हे तूप आणि लसूण सूपामध्ये घाला.
  8. सर्व्ह करताना बदामाचे काप घालूनगरमागरम सूप सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर