मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी

Photo of Potato and capsicum veg by Nayana Palav at BetterButter
669
8
0.0(0)
0

बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी

Jun-15-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी कृती बद्दल

घरात भोपळी मिरची व बटाटे असतील तर चटकन होणारी ही भाजी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे २ मोठे
  2. भोपळी मिरची २
  3. कांदा १
  4. टोमॅटो १
  5. तेल फोडणीसाठी
  6. हिंग १/४ टीस्पून
  7. हळद १/४ टीस्पून
  8. मोहरी १/४ टीस्पून
  9. जिरे १/४ टीस्पून
  10. कढीपत्ता ३-४ पाने
  11. आल लसूण पेस्ट १ टीस्पून
  12. मालवणी मसाला २ टीस्पून
  13. काश्मीरी मिरची पावडर १ टीस्पून
  14. कोथिंबीर मुठभर
  15. ओले खोबरे ३ टेबलस्पून
  16. मीठ आवश्यकतेनुसार

सूचना

  1. बटाटे कापून पाण्यात ठेवा.
  2. कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची कापून घ्या.
  3. एक कढई गरम करा, त्यात तेल घाला.
  4. तेलात हिंग, मोहरी, हळद, जिरे, कढीपत्ता याची फोडणी करा.
  5. आता कांदा घाला.
  6. टोमॅटो घाला.
  7. आल लसूण पेस्ट व मसाले घाला.
  8. नीट मिक्स करा.
  9. आता बटाटे, मीठ घाला.
  10. बटाटे शिजले की भोपळी मिरची घाला.
  11. कोंथिबीर, खोबरे घाला.
  12. तयार आहे तुमची चविष्ट भाजी.
  13. चपाती, रोटीबरोबर, भाकरी सोबत करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर