Photo of Zuddles by archana chaudhari at BetterButter
529
1
0.0(0)
0

झुडल्स

Jun-15-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुडल्स कृती बद्दल

नेहमीच्या पास्ताला एक हेल्दी पर्याय आहे झुडल्स.झुकीनी पासून बनविले आहेत.झुकीनी हे जीवनसत्त्व युक्त एक कमी कॅलोरी असलेली फळभाजी आहे.यात भरपूर प्रमाणात पोट्याशिअम,प्रॉव्हिटॅमिन A आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवी झुकीनी 1
  2. गाजर 1 लहान
  3. टोमॅटो 2
  4. हिरवी मिरची 1
  5. बेसिल पाने 4
  6. लसूण पाकळ्या 5
  7. कांदा लहान 1
  8. टोमॅटो केचप 1 चमचा
  9. काळी मिरी पावडर 1/2 चमचा
  10. पिझ्झा सिझनीग 1 चमचा
  11. ऑलिव्ह ऑइल 1 मोठा चमचा
  12. चीज स्लाइस 1
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. झुकीनी आणि गाजर चे लांब लांब नूडल्स सारखे किसून घ्या,बाजारात यासाठी स्पायलराझर मिळते पण मी ग्रेटर ने केले आहे.
  2. सगळे साहित्य एकत्र करून ठेवा.
  3. एका कढईत गरम पाणी करायला ठेवा,पाणी उकळल्यावर त्यात झुकीनी आणि गाजरच्या नूडल्स टाका,1 मिनिट ठेऊन लगेच गाळून घ्या.पाणी फेकू नका, किचन मध्ये वापरता येईल.
  4. दुसऱ्या कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेली बेसिल ची पाने घाला.
  5. टोमॅटोची पेस्ट घाला.
  6. चांगले परतू दया.
  7. सगळे मसाले घाला.
  8. उकडलेल्या झुडल्स घाला,मीठ घाला.
  9. वरून किसलेले चीज घाला.
  10. झटपट झुडल्स तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर