पालक फ्रिटाटा | Quick Spinach Frittata Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  16th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Quick Spinach Frittata recipe in Marathi,पालक फ्रिटाटा, Sujata Hande-Parab
पालक फ्रिटाटाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

2

पालक फ्रिटाटा recipe

पालक फ्रिटाटा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quick Spinach Frittata Recipe in Marathi )

 • पालक पाने बारीक चिरलेली - ३/४ - १ कप
 • लाल शिमला मिरची - १/४ कप
 • कांदा मध्यम - १/२ उभा चिरून घेतलेला 
 • लाल मिरची फ्लेक्स - १ टीस्पून
 • किसलेले चीज - ३-४ टेबलस्पून  
 • दूध - १ टेबलस्पून
 • तेल - १-२ टेबलस्पून
 • मीठ चवीनुसार 
 • सजावटीसाठी - पालकाची पाने - २-३, सिमला मिरची लाल कांदा, चीज किसलेले

पालक फ्रिटाटा | How to make Quick Spinach Frittata Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात अंडी, लाल मिरची फ्लेक्स, दूध, किसलेले चीज, आणि एक छोटी चिमूट मीठ टाकावे. चांगले फेटून घ्यावे. बाजूला ठेवावे. मीठ कमीच टाकावे. चीज मध्ये आधीच मीठ असते.
 2. एका पॅन मध्ये तेल टाकून गरम करून घ्यावे. त्यात उभा चिरलेला कांदा टाकून १/२ मिनिट परतून घ्यावा.
 3. कापलेली सिमला मिरची टाकावी . काही सेकंद परतून घ्यावी. जास्त भाजू नये.
 4. चिरलेला पालक टाकावा. एक छोटी चिमुट मीठ शिंपडावे. थोडे परतून घ्यावे. मिश्रण तव्यावर चांगले पसरवून घ्यावे.
 5. बनवलेले अंड्याचे मिश्रण गोलाकार टाकावे. १/२ मिनिट ठेवून बाजू थोड्या वेगळ्या करून घ्याव्या. झाकण ठेवावे. गॅस मंद ठेवावा.
 6. झाकण काडून वरची बाजू थोडी कडक झाली असल्यास आम्लेट किंवा फ्रिटाटा एका प्लेटवर उलटा करून घ्यावा.
 7. पॅनवर थोडे तेल स्प्रिंकल करून दुसऱ्या बाजूने १/२ मिनिट भाजून घ्यावा.
 8. प्लेटवर काढून सर्व्हे करावा.

My Tip:

नेहमी मंद माध्यम आचेवर शिजवा आपल्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात.

Reviews for Quick Spinach Frittata Recipe in Marathi (2)

Poonam Nikam5 months ago

nice
Reply
Sujata Hande-Parab
4 months ago
thank you dear..:blush::blush:

Nayana Palav5 months ago

Wow
Reply
Sujata Hande-Parab
5 months ago
Thank you dear...:heart_eyes: