Photo of Quick Spinach Frittata by Sujata Hande-Parab at BetterButter
673
6
0.0(2)
0

Quick Spinach Frittata

Jun-16-2018
Sujata Hande-Parab
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इटालियन
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • व्हिस्कीन्ग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक पाने बारीक चिरलेली - ३/४ - १ कप
  2. लाल शिमला मिरची - १/४ कप
  3. कांदा मध्यम - १/२ उभा चिरून घेतलेला 
  4. लाल मिरची फ्लेक्स - १ टीस्पून
  5. किसलेले चीज - ३-४ टेबलस्पून   
  6. दूध - १ टेबलस्पून
  7. तेल - १-२ टेबलस्पून
  8. मीठ चवीनुसार 
  9. सजावटीसाठी - पालकाची पाने - २-३, सिमला मिरची लाल कांदा, चीज किसलेले

सूचना

  1. एका वाडग्यात अंडी, लाल मिरची फ्लेक्स, दूध, किसलेले चीज, आणि एक छोटी चिमूट मीठ टाकावे. चांगले फेटून घ्यावे. बाजूला ठेवावे. मीठ कमीच टाकावे. चीज मध्ये आधीच मीठ असते.
  2. एका पॅन मध्ये तेल टाकून गरम करून घ्यावे. त्यात उभा चिरलेला कांदा टाकून १/२ मिनिट परतून घ्यावा.
  3. कापलेली सिमला मिरची टाकावी . काही सेकंद परतून घ्यावी. जास्त भाजू नये.
  4. चिरलेला पालक टाकावा. एक छोटी चिमुट मीठ शिंपडावे. थोडे परतून घ्यावे. मिश्रण तव्यावर चांगले पसरवून घ्यावे.
  5. बनवलेले अंड्याचे मिश्रण गोलाकार टाकावे. १/२ मिनिट ठेवून बाजू थोड्या वेगळ्या करून घ्याव्या. झाकण ठेवावे. गॅस मंद ठेवावा.
  6. झाकण काडून वरची बाजू थोडी कडक झाली असल्यास आम्लेट किंवा फ्रिटाटा एका प्लेटवर उलटा करून घ्यावा.
  7. पॅनवर थोडे तेल स्प्रिंकल करून दुसऱ्या बाजूने १/२ मिनिट भाजून घ्यावा.
  8. प्लेटवर काढून सर्व्हे करावा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Jun-17-2018
Poonam Nikam   Jun-17-2018

nice

Nayana Palav
Jun-16-2018
Nayana Palav   Jun-16-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर