बटाटा चीज पराठा | Potato Cheese Parathas Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  16th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Potato Cheese Parathas recipe in Marathi,बटाटा चीज पराठा, Nayana Palav
बटाटा चीज पराठाby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

2

बटाटा चीज पराठा recipe

बटाटा चीज पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Cheese Parathas Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ २ कप
 • बटाटे २ मोठेचीज
 • चीज २ क्यूबज्
 • चाट मसाला १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • पाणी पीठ मळण्यासाठी

बटाटा चीज पराठा | How to make Potato Cheese Parathas Recipe in Marathi

 1. गव्हाच्या पिठात पाणी, मीठ घालून पीठ घट्ट मळून घ्या.
 2. बटाटे कुकरला उकडून घ्या.
 3. बटाटे हाताने कुस्करून घ्या.
 4. आता चीज किसून घ्या.
 5. बटाटा, चीज, मीठ, चाट मसाला हाताने एकत्र करा.
 6. आता पीठाचा गोळा घेउन लाटा.
 7. मध्ये जरा जाड ठेवा.
 8. आता बटाटयाचा गोळा मध्ये ठेवून पीठाचा गोळा बंद करा.
 9. सुके पीठ घेउन हलक्या हाताने पराठा लाटा. काटयाने पराठयावर नक्षी करा.
 10. काटयाने पराठयावर नक्षी करा.
 11. तवा गरम करा.
 12. पराठा दोन्ही बाजूने भाजा.
 13. नंतर पराठयाला तूप लावा.
 14. पराठा दोन्ही बाजूने भाजा.
 15. तयार आहे तुमचा स्वदिष्ट बटाटा चीज पराठा.
 16. दहयासोबत पराठा करा.

My Tip:

तुमच्या आवडत्या भाज्या यात घालू शकता.

Reviews for Potato Cheese Parathas Recipe in Marathi (2)

Pranali Deshmukh5 months ago

मस्त
Reply

Sujata Hande-Parab5 months ago

Yummy tasty...
Reply