ओट्स चीझ डोसा | Oats cheese Dosa Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  16th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Oats cheese Dosa recipe in Marathi,ओट्स चीझ डोसा, Aarti Nijapkar
ओट्स चीझ डोसाby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

1

ओट्स चीझ डोसा recipe

ओट्स चीझ डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oats cheese Dosa Recipe in Marathi )

 • ओट्स १/२ कप
 • रवा १/४ कप
 • तांदळाचं पीठ १ मोठा चमचा
 • ताक १/२ कप
 • कांदा बारीक चिरलेला १
 • हिरवी मिरची १
 • कोथिंबीर चिरलेली १ चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • गरम मसाला १/२ लहान चमचा
 • लाल तिखट १ लहान चमचा
 • काळीमिरी १/४ लहान चमचा
 • चीझ किसलेले १/३ कप

ओट्स चीझ डोसा | How to make Oats cheese Dosa Recipe in Marathi

 1. एका भांड्यात ओट्स किंवा ओट्स पावडर , रवा , तांदळाचे पीठ एकत्र करून घ्या
 2. आता चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर , कांदा , घालून एकत्र करा
 3. मग चवीनुसार मीठ , लाल तिखट , गरम मसाला , घालून एकत्रित करून घ्या
 4. आवश्यकतेनुसार ताक घालून मिश्रण एकजीव करून घ्या व २ मिनिटे ठेवून द्या
 5. तोपर्यंत तवा गरम घ्या तवा तापला की त्यावर तेल पसरवून घ्या अगदी थोडंस
 6. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या मग खोलगट चमच्याने मिश्रण तव्यावर घाला व पसरवून घ्या
 7. त्यावर व बाजूने तेल सोडा व सोनेरी होईपर्यंत डोसा करा
 8. डोसा झाल्यावर त्यावर किसलेले चीझ घाला थोडंस गरम मसाला व काळीमिरी पावडर घाला
 9. डोस्याला रोल करा व काढा
 10. आता गरमागरम ओट्स चीझ डोसा तयार आहे

My Tip:

तांदळाच्या पीठ ऎवजी मैदा घालू शकता

Reviews for Oats cheese Dosa Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply