ग्रील भूर्जी पाव | Grilled Bhurji Paav Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Grilled Bhurji Paav recipe in Marathi,ग्रील भूर्जी पाव, Aarti Nijapkar
ग्रील भूर्जी पावby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

ग्रील भूर्जी पाव recipe

ग्रील भूर्जी पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Grilled Bhurji Paav Recipe in Marathi )

 • अंडी ३
 • कांदे बारीक चिरलेले २ मोठे
 • टमाटर बारीक चिरलेले १ मध्यम
 • आलं लसूण पेस्ट १/२ लहान चमचा
 • हिरवी मिरची १
 • कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
 • तेल १ मोठा चमचा
 • जिरे १/४ लहान चमचा
 • हिंग चिमूटभर
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • धने पाउडर १/२ लहान चमचा
 • जीरा पावडर १/२ लहान चमचा
 • गरम मसाला १/२ चमचा
 • बिर्याणी मसाला १/४ लहान चमचा
 • पाव ४
 • बटर २ मोठे चमचे
 • कांदा रिंग मध्ये कापलेले
 • टमाटर रिंग मध्ये कापलेले

ग्रील भूर्जी पाव | How to make Grilled Bhurji Paav Recipe in Marathi

 1. कढईत तेल घालून तापवून घ्या
 2. त्यात जिरे घाला व तडतडू द्या मग हिंग घाला
 3. आता चिरलेला कांदा , टमाटर , हिरवी मिरची , चवीनुसार मीठ व हळद मध्यम आचेवर घालून लालसर परतवून घ्या
 4. आता लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर , बिर्याणी मसाला घालून मिश्रण परतवून घ्या थोडंस पाणी घाला व मिश्रण मसाला एकजीव करून घ्या
 5. आता अंडी एका बाउल मध्ये फोडून घ्या
 6. तयार मसाल्याच्या मिश्रणामध्ये अंडी न फेटता घाला व गॅस मंद करून मिश्रण एकजीव करून घ्या
 7. झाकण ठेवून १ ते २ मिनिटे वाफवून घ्या
 8. चिरलेली कोथिंबीर घालून भूर्जी एकजीव करुन घ्या व गॅस बंद करा
 9. ग्रील पॅन तापवून त्यावर बटर घालून पाव गरम करून घ्या
 10. पाव मध्ये रींग कांदा टमाटर घालून त्यावर तयार भूर्जी घाला
 11. आता गरमागरम मस्त ग्रील भूर्जी पाव खाण्यास न सर्व्ह करण्यास तयार आहे

My Tip:

भूर्जी करतानाच ग्रील पॅन तापवून घ्या मग बटर घालून पाव ग्रील करा

Reviews for Grilled Bhurji Paav Recipe in Marathi (0)