वडा पाव | Wada pav Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wada pav recipe in Marathi,वडा पाव, Archana Chaudhari
वडा पावby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

0

About Wada pav Recipe in Marathi

वडा पाव recipe

वडा पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wada pav Recipe in Marathi )

 • बटाटे मध्यम 3
 • लसूण पाकळ्या 5
 • हिरवी तिखट मिरची 6
 • अख्खे धणे 1 चमचा
 • हळद 1/2चमचा
 • मीठ चवीनुसार
 • बेसन पीठ 1 आणि 1/2 वाटी
 • तळण्यासाठी तेल

वडा पाव | How to make Wada pav Recipe in Marathi

 1. बटाटे उकडून गार करून थोडेसे कुस्करून घ्या.
 2. मसाला बनवण्यासाठी कढईत कमी तेल टाका.
 3. तेलात मोहरी आणि भरडले अख्खे धणे टाका.
 4. लसूण ,मिरची जाडसर कुटून टाका.
 5. बटाटे टाका, हळद आणि मीठ घाला.
 6. शेवटी थोडी कोथिंबीर टाका
 7. गार झाल्यावर छोटे छोटे चपटे गोळे करून घ्या.
 8. बेसन पिठात मीठ,1 चमचा तापलेले तेल टाकून पाणी टाकून भिजवून घ्या.
 9. खूप पातळ करू नका.
 10. आता तेल तापले की बटाट्याचा गोळा बेसन पिठात बुडवून तळून घ्या.
 11. गरम गरम वडे पाव मध्ये टाकून वडापाव खा.
 12. सोबत तळलेली हिरवी मिरची खा. :yum: :yum:

My Tip:

बटाट्याचे गोळे तुम्ही आधी करून ठेवले तर वडे पटकन होतील.सारणामध्ये तुम्ही पुदिना टाकू शकता.

Reviews for Wada pav Recipe in Marathi (0)