चणा डाळ वडे | Chana Daal Vada Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chana Daal Vada recipe in Marathi,चणा डाळ वडे, Priti Tara
चणा डाळ वडेby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

चणा डाळ वडे recipe

चणा डाळ वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana Daal Vada Recipe in Marathi )

 • १ कप चणाडाळ
 • ५ ते ६ हिरव्या मिरच्या
 • ८ ते १० लसूण पाकळ्या
 • १ इंच आले
 • १० ते १५ कढीपत्ता पाने
 • १/२ टिस्पून हळद
 • १ टिस्पून जीरे
 • १ टिस्पून तीळ
 • १/२ कप कोथिंबीर, बारीक चिरून
 • १ कप तेल तळण्यासाठी
 • चवीपुरते मिठ

चणा डाळ वडे | How to make Chana Daal Vada Recipe in Marathi

 1. चणा डाळ धुवून घ्यावी. नंतर २ ते ३ तास भिजवावी. चाळणीत ओतून पाणी निथळून टाकावे. डाळ तशीच अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निघून जाईल.
 2. २) मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या (मोडून), आले लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
 3. ३) वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जीरे घालून मिक्स करावे.
 4. ४) कढईत तेल गरम करावे. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर तळून काढावा. गरम गरम वडा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर सर्व्ह करावा.

My Tip:

वड्याच्या मिश्रणात १ कांदा बारीक चिरून घातल्यास जरा वेगळा पण छान स्वाद येतो

Reviews for Chana Daal Vada Recipe in Marathi (0)