मुख्यपृष्ठ / पाककृती / चायनीज बटाटा वडा

Photo of Chinese Potato Fritters. by Priti Tara at BetterButter
0
2
0(0)
0

चायनीज बटाटा वडा

Jun-18-2018
Priti Tara
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चायनीज बटाटा वडा कृती बद्दल

चायनीज बटाटा वडा काही तरी नवीन प्रकार आहे जो माझ्या experiment मधून सक्सेसफूल झालेला पदार्थ आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बनवून पहाल. आपल्या नेहमीच्या बटाटे वड्यासारखच सगळं आहे यामध्ये मी काही भाज्या व इतर जिन्नस घालून त्याला देसी चायनीज तडका दिला आहे.

रेसपी टैग

 • मध्यम
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

 1. ५-६ उकडून घेतलेले बटाटे
 2. बारीक चिरलेला कोबी + ढोबळी मिरची १ वाटी
 3. आलं + हिरवी मिरची + लसूण
 4. हळद + गरम मसाला १-१चमचा
 5. सोय + ग्रीन चिल्ली सॉस
 6. कढीपत्ता व कोथिंबीर
 7. हिंग व मोहरी
 8. २ वाटी बेसन
 9. मक्याच पिठ २-३ चमचे
 10. खायचा कलर (शेंदरी)
 11. चवीनूसार मीठ
 12. खायचा सोडा चिमूटभर
 13. फोडणी व तळण्यासाठी तेल .

सूचना

 1. उकडून घेतलेले बटाटे साल काढून घ्या आणि स्वच्छ धूतलेल्या हाताने ते बारीक करा. आलं + लसूण + हिरवी मिरची वाटा. ( खरतर खलबत्त्यामध्येच हे वाटाव ) कोबी आणि ढोबळी मिरची बारीक चिरून घ्या.
 2. कढईत ३-४ चमचे तेल घालून हिंग + मोहरी व कढीपत्ता ची फोडणी करा. त्यामध्ये आलं + लसूण + हिरवी मिरचीच वाटण घाला.
 3. त्यामध्ये 1 चमचा हळद व गरम मसाला + चवीनुसार मीठ घाला.
 4. सोय + ग्रीन चिल्ली साँस घाला. व्यवस्थित परतावे . आता कोबी + ढोबळी मिरची घालून परता आता बारीक केलेला बटाटा घाला आणि परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एका ताटात ही भाजी स्वच्छ हाताने थोडी मिक्स करून पुन्हा कढईत टाकून परतून कढई उतरवा. भाजी थंड होऊ द्या.
 5. एका भांड्यात बेसन + मक्याच पिठ + खायचा कलर + खायचा सोडा + चवीनूसार मीठ व गरजेनुसार पाणी एकत्रित करून पिठ तयार करा.
 6. कढईत तेल तापवा . तयार भाजीचे गोळे हातावर घेऊन चपटे बनवून तयार पिठामध्ये घोळवून एक एक करून वडे कढईत सोडा. दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घ्या. तयार वडे टोमॅटो सॉस किंवा सेझवान चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर