तळलेले मोदक | Fried Modak Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried Modak recipe in Marathi,तळलेले मोदक, Priti Tara
तळलेले मोदकby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

तळलेले मोदक recipe

तळलेले मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried Modak Recipe in Marathi )

 • सारणासाठीचं साहित्य: ३ वाट्या खोवलेलं ओलं खोबरं, दीड वाटी गूळ, प्रत्येकी अर्धी वाटी बदाम तसंच पिस्त्याचे काप, अर्धी वाटी काजुचे बारीक तुकडे, अर्धी वाटी बेदाणे, पाव वाटी चारोळी, अर्धा टीस्पून जायफळ पूड, १ टेबलस्पून साजुक तूप
 • वरच्या पारीसाठीचं साहित्य: ३ वाट्या कणीक, १ टेबलस्पून रवा, १ टेबलस्पून तूप, पाव टीस्पून मीठ, पाव टीस्पून साखर (साखरेनं वरची पारी खुसखुशीत होते), भिजवायला लागेल तितकं दूध

तळलेले मोदक | How to make Fried Modak Recipe in Marathi

 1. १) प्रथम कणीक, रवा, मीठ आणि साखर नीट मिसळून घ्या. २) त्यात तूप कडकडीत गरम करून घाला. नीट हलवून त्यात लागेल तितकं दूध घाला आणि पु-यांसाठी मळतो तशी घट्ट कणीक भिजवा. ३) कणीक मोदक करायच्या अर्धा ते एक तास आधी भिजवा.
 2. सारणाची कृती: १)एका कढईत ओलं खोबरं, गूळ, सुका मेवा आणि तूप घाला. २) ते सगळं नीट मिसळून घ्या आणि मंद आचेवर कढई ठेवा. ३) त्यावर झाकण ठेवा आणि मधूनमधून हलवत साधारणपणे १५ मिनिटं शिजू द्या. ४) आता त्यात जायफळाची पूड घाला, हलवून घ्या आणि गॅस बंद करा.
 3. मोदकांची कृती: १) लहान लिंबाएवढा उंडा घ्या. २) पुरी लाटतो तशी लाटी लाटा, पण पुरीपेक्षा पातळ लाटा. ३) पारी हातावर घेऊन त्यात हवं तितकं सारण भरा. ४) फोटोत दाखवल्याप्रमाणे लाटीला हलक्या हातानं कळ्या पाडा. ५) सगळ्या कळ्या एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्या. ६) असे सगळे मोदक करून घ्या. ७) कढईत तूप गरम करून मोदक लाल रंगावर तळून घ्या.
 4. चतुर्थीच्या साग्रसंगीत जेवणाबरोबर मोदक द्या. जेवणाची लज्जत वाढेलच!

Reviews for Fried Modak Recipe in Marathi (0)