उसळ वडा | Usal vada Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Surwade  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Usal vada recipe in Marathi,उसळ वडा, Ujwala Surwade
उसळ वडाby Ujwala Surwade
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

उसळ वडा recipe

उसळ वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Usal vada Recipe in Marathi )

 • अर्धा पाव मोड आलेली उसळ (मटकी
 • अर्धा किलो बटाटे
 • कांंदे मिडीयम 3
 • खोबरा कीस 3टेबल स्पून
 • धनेपूड 1 टेबलस्पून
 • लाल तिखट 3 टेबलस्पून
 • गरम मसाला अर्धा टीस्पून
 • जिरं 1टीस्पून
 • तीळ 1टीस्पून
 • खसखस 1टीस्पून
 • हळद पाव टीस्पून
 • आलं -लसूण पेस्ट 2टेबलस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल गरजेनुसार
 • पाणी आवश्यकतेनुसार

उसळ वडा | How to make Usal vada Recipe in Marathi

 1. बटाटे धुऊन कुकरमध्ये पाणी घालून वाफवा
 2. लोखंडी तव्यावर कांदा ,खोबरं ,जिरं ,तीळ ,
 3. खसखस थोडे तेल घालून खरपूस भाजून घ्या
 4. सर्व वेगळे भाजून एका प्लेट मध्ये काढून घ्या
 5. गार झाल्यावर मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या
 6. गँसवर पातेले तापत ठेवून तेल टाका.
 7. तेल तापल्यावर वाटण टाका, आलं -लसूण पेस्ट
 8. धनेपूड टाका मस्त परतवून कडेने तेल सुटल्यानंतर
 9. लाल तिखट घाला पुन्हा परतवून मग पाणी घालून
 10. उकळी येऊ द्या. नंतर उसळ धुवून उकळीत टाका
 11. मंद गॅसवर मस्त शिजू द्या सोबतच मीठ ,हळद ,
 12. गरम मसाला घाला. शिजल्यावर कोथिंबीर घाला
 13. बटाटे साल काढून मँश करून घ्या
 14. त्यातच मीठ ,तिखट, किंचित हळद टाकून
 15. एकजीव करा आणि वडे बनवा.
 16. खातांना प्लेटमध्ये वडा ठेवा त्यावर उसळ
 17. बारीक चिरलेला कांदा ,कोंथिबीर, लिंबू पिळून
 18. खायला तयार वडा उसळ

My Tip:

काही गोष्टी मी विसरली आहे .जसं बेसन पीठ लिंबू ,वगैरे वगैरे तिकडे तज्ञ मंडळी लक्ष देऊ नका.कारण वडा उसळ खावून मी सुस्तावली

Reviews for Usal vada Recipe in Marathi (0)