मुख्यपृष्ठ / पाककृती / मेदू वडा सांभर

Photo of Medu Vada Sambhar by Priti Tara at BetterButter
747
4
0.0(0)
0

मेदू वडा सांभर

Jun-19-2018
Priti Tara
360 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदू वडा सांभर कृती बद्दल

मेदू वडा हा दक्षिणात्य पारंपारिक पदार्थ असून तो दक्षिण भारतात जेवणात आणि नाश्त्यासह केव्हाही खाल्ला जातो. उडीदाच्या डाळीपासून बनवलेला हा पदार्थ कुरकुरीत व अतिशय खमंग व चविष्ट असा पदार्थ आहे. याचा आकार अमेरिकेत मिळणाऱ्या डोनट सारखा  असतो व तो बाहेरून कुरकुरीत असलं तरी आतून नरम असतो. मेदू वडे सांभर व नारळाच्या चटणी बरोबर खाल्ले जातात.

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. दिड कप उडीद डाळ
  2. ४ ते ६ मिरे,भरड कुटलेले
  3. २ टेस्पून खोबर्‍याचे पातळ काप (१ सेंमी)
  4. २ हिरव्या मिरच्या,बारीक चिरून
  5. ५ ते ६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
  6. १/२ टिस्पून जाडसर किसलेले आले
  7. चवीपुरते मिठ

सूचना

  1. १) उडीद डाळ धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये (टीप १ आणि ३).
  2. २) मिक्सरमधून वाटण एका खोलगट वाडग्यात काढावे. हे मिश्रण शक्यतो हातानेच फेसावे, म्हणजे हाताने थापटी देउन बोटांनी मिश्रण वर उचलावे. असे जलद गतीने मिश्रण वर खाली करावे. काही मिनिटातच मिश्रण हातालाच हलके झालेले जाणवेल. मिश्रण एकदम घट्ट वाटत असेल तर हात पाण्यात बुडवून मग फेटावे. हाताने शक्य नसल्यास हॅण्ड मिकसरने, एग बिटरने किंवा चमच्याने ३ ते ४ मिनीटे घोटावे. यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते, तसा फरक लगेचच जाणवतो. नंतर मिरे, खोबर्‍याचे काप, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे.
  3. ३) वडे तळायला घ्यायच्या आधी एका बोलमध्ये पाणी घ्यावे. उडदाचे मिश्रण हाताळताना आधी हात ओला करावा, म्हणजे वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडताना पिठ हाताला चिकटणार नाही.
  4. ४) तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम हायवर ठेवावा. वडे सोनेरी किंवा गडद सोनेरी रंगावर तळून घ्यावे. चटणी आणि सांभरबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर