Photo of Mango mava kachori by Rohini Rathi at BetterButter
721
9
0.0(1)
0

Mango mava kachori

Jun-19-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. आवरणासाठी
  2. मैदा अर्धा कप
  3. तूप एक टेबल्स्पून
  4. पिवळा रंग चुटकी भर
  5. आंब्याचा रस पाव कप
  6. आतील सारणासाठी
  7. मावा अर्धा कप
  8. वेलची पूड एक टी स्पून
  9. तीन टेबल स्पून बारीक तुकडे ड्रायफ्रूट्सचे
  10. पिठीसाखर अर्धा कप
  11. तूप कचोरी तळण्यासाठी
  12. पाक बनवण्यासाठी
  13. अर्धा कप साखर
  14. पाव कप पाणी
  15. एक चमचा केशर भिजवलेले

सूचना

  1. आवरण बनवण्यासाठी सर्वप्रथम मैद्यामध्ये तूप आंब्याची प्युरी पिवळा रंग व मीठ घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
  2. तयार पिठावर कपडा झाकून दहा मिनिटे ठेवावे
  3. आतील सारणासाठी कढईमध्ये मावा परतून घ्यावा
  4. त्यात वेलचीपूड व ड्रायफ्रुट्स घालून परतून घ्यावे
  5. तूप सुटेपर्यंत मिश्रण परतावे
  6. मिश्रण ताटात काढून थंड करून घ्यावे
  7. थंड मिश्रणात पिठीसाखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  8. पाक बनवण्यासाठी साखर व पाणी घालून साखर वितळेपर्यंत मिश्रण उकळून घ्यावे
  9. कचोरी बनवण्यासाठी मैद्याच्या पिठातून छोटे गोळे घेऊन त्याची पुरी लाटून घ्यावी
  10. लाटलेल्या पोळीमध्ये तयार सारण घालून कचोरी सर्व बाजूने बंद करून घ्यावी
  11. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घ्याव्यात
  12. कढईमध्ये तूप गरम करून मंद आचेवर कचोरी तळून घ्यावी
  13. तळलेल्या कचोरीला चाकूच्या साह्याने भोके पाडून घ्यावे
  14. त्यात तयार पाक चमचा च्या साह्याने सोडावा
  15. तयार करीत कचोरीवर ड्रायफ्रुटचे तुकडे घालून सजवावे व सर्व करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pranali Deshmukh
Jun-20-2018
Pranali Deshmukh   Jun-20-2018

Awesome

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर