तळलेल्या इडली चाट | Fried idli chat Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried idli chat recipe in Marathi,तळलेल्या इडली चाट, Rohini Rathi
तळलेल्या इडली चाटby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

तळलेल्या इडली चाट recipe

तळलेल्या इडली चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried idli chat Recipe in Marathi )

 • इडली दहा ते बारा
 • दही एक कप
 • बारीक चिरलेला कांदा
 • चिंचेची चटणी दोन टेबल स्पून
 • चाट मसाला एक टी स्पून
 • लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
 • मीठ चवीनुसार
 • बारीक शेव अर्धा कप
 • हिरवी चटणी 1 टी स्पून

तळलेल्या इडली चाट | How to make Fried idli chat Recipe in Marathi

 1. उरलेल्या इडलीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे
 2. कढईत तेल गरम करून इडलीची तुकडे तळून घ्यावेत
 3. तळलेल्या इडलीच्या तुकड्या वरती चाट मसाला लाल मिरची पावडर मीठ घालून घ्यावे व एकत्र करून घ्यावे
 4. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तळलेली इडली घालून त्यावर ती दही घालून घ्यावे
 5. बारीक चिरलेला कांदा घालावा
 6. वरती चिंचेची चटणी हिरवी चटणी व बारीक शेव घालून सर्व करावी
 7. अशाप्रकारे तळलेली इडली चाट तयार आहे

My Tip:

आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर ही घालू शकतात

Reviews for Fried idli chat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo