मूळ्याच्या पानांचे पकोडे चायनीज तडका ट्वीस्ट | Vegetables Fritters Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vegetables Fritters recipe in Marathi,मूळ्याच्या पानांचे पकोडे चायनीज तडका ट्वीस्ट, Priti Tara
मूळ्याच्या पानांचे पकोडे चायनीज तडका ट्वीस्टby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  8

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मूळ्याच्या पानांचे पकोडे चायनीज तडका ट्वीस्ट recipe

मूळ्याच्या पानांचे पकोडे चायनीज तडका ट्वीस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetables Fritters Recipe in Marathi )

 • ८-१० मूळ्याची पाने स्वच्छ धुवून
 • आलं + लसूण + मिरची वाटून १- दिड चमचा
 • सोय + ग्रीन चिल्ली सॉस १ चमचा
 • बेसन १ वाटी
 • मक्याच पिठ १ चमचा
 • चिमूटभर खायचा सोडा
 • मीठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तेल

मूळ्याच्या पानांचे पकोडे चायनीज तडका ट्वीस्ट | How to make Vegetables Fritters Recipe in Marathi

 1. मूळ्याची पाने स्वच्छ धुवून त्यांना बारीक चिरून घ्या.
 2. बेसन व इतर सर्व जिन्नस एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी घाला.
 3. कढईत पकोडे तळण्यासाठी तेल गरम करा.
 4. वरील मिश्रणाचे हाताने पकोडे कढईत सोडा.
 5. दोन्ही बाजूंनी परतत पकोडे व्यवस्थित तळून घ्या .
 6. तयार पकोडे टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

My Tip:

मूळ्याच्या भाजीच्या ठिकाणी तुम्ही इतर पालेभाज्या घेऊन त्यांचे ही पकोडे बनवू शकता.

Reviews for Vegetables Fritters Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo