खुसखुशीत आळुवडी | Aluvadi Recipe in Marathi

प्रेषक Sarika More  |  19th Jun 2018  |  
3 from 1 review Rate It!
 • Aluvadi recipe in Marathi,खुसखुशीत आळुवडी, Sarika More
खुसखुशीत आळुवडीby Sarika More
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

1

खुसखुशीत आळुवडी recipe

खुसखुशीत आळुवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aluvadi Recipe in Marathi )

 • 10-15 आळुची पाने
 • अर्धी वाटी बेसन पिठ
 • पाव वाटी तांदुळाचे मपिठ
 • 10-12 हिरव्या मिर्च्या
 • एक गड्डी लसुन
 • चवी पुरत मिठ
 • चिंच गुळाचे पाणी
 • अर्ध्या लिबुंचा रस
 • एक टेबल स्पुन जिरे
 • एक टी स्पुन हळद
 • कोथिंबीर
 • खोबर्याचा तुकडा (ओला / सुक्या )
 • पांढरे तिळ
 • तळण्यासाठी तेल
 • पाणी

खुसखुशीत आळुवडी | How to make Aluvadi Recipe in Marathi

 1. प्रथम आळुची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत
 2. चिंच व गुळ एकत्र भिजत ठेवावेत
 3. लसुन, हिरव्या मिर्च्या, कोंथबिरा, बारीक केलेले खोबरे , मिठ, हळद , लिंबाचा रस सगळे एकत्र करुन मिक्सरला बारीक करून घेणे.
 4. गँस वर एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावेत . त्या पातेल्यावर चाळणीला तेल लावुन ठेवावे.
 5. दुसऱ्या एका भांड्यात बेसनपिठ व तांदुळाचे पिठ एकत्र घ्यावेत. त्यात हिरव्या मिर्चिचे वाटण घालावे, चिंच गुळाचे पाणी घालावे व सर्व चांगले एकत्र मिक्स करावे. त्यात लागेल तसे पाणी हळु हळु मिक्स करावे. जास्त पातळ ही नाही आणि जास्त घट्ट ही नाही अस मध्यम बँटर तयार करावे .
 6. पोळपाटा वर एक एक आळुच पान घेऊन त्यावर पिठाचे मिश्रण लावुन वड्या वळाव्यात
 7. पातेल्यावर ठेवलेल्या चाळणीत एक एक वड्यांची गुंडाळी ठेवावी
 8. त्यावर झाकण ठेऊन वड्या शिजत ठेवाव्यात
 9. 10 ते 15 मिनीटाने सुरीच्या सहाय्याने वडी शिजली का पहावे
 10. वडी शिजवून झाल्यावर ती ठंड करुन घ्यावी
 11. गँसवर कढाईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे
 12. सुरीच्या सहाय्याने वड्या कापुन घ्याव्यात
 13. तेल चांगले गरम झाल्यावर एक एक वडी तेलात सोडावी व चांगली लालसर तळुन घ्यावी .(डिप फ्राय किंवा शँलो फ्राय केली तरी चालते )
 14. वड्या तळ्यावर प्लेट मध्ये काढुन घ्यावेत
 15. गरमा गरम खुसखुशीत वडी तयार

My Tip:

तांदळाचे पिठ घातलेल्या मुळे वडी खुसखुशीत होते.

Reviews for Aluvadi Recipe in Marathi (1)

deepali oak5 months ago

सरिका तुम्ही चुकुन स्वत: चा पीक ठेवलाय तो बदला....
Reply
Sarika More
5 months ago
हो चुकुन माझाच फोटो सेव्ह झालता केला चेंज