ड्राय ब्रेड मनचुरियन | Dray Bread Manchurian Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  20th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dray Bread Manchurian recipe in Marathi,ड्राय ब्रेड मनचुरियन, Bharti Kharote
ड्राय ब्रेड मनचुरियनby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

0

ड्राय ब्रेड मनचुरियन recipe

ड्राय ब्रेड मनचुरियन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dray Bread Manchurian Recipe in Marathi )

 • 8/10 ब्रेड
 • 1 वाटी कोबीचा खीस
 • 1 वाटी गाजराचा खीस
 • 2 टीस्पून काॅरन फलोवर
 • 1 टीस्पून लाल तिखट
 • 1/2 टीस्पून हळद
 • चवीनुसार मीठ
 • 1वाटी सिमला मिरची चिरून
 • 1वाटी कांदा चिरून
 • 1 टीस्पून ओवा
 • पाव चमचा जीरे
 • पाव चमचा काळे मिरे
 • 1 मोठा चमचा टोमॅटो साॅस
 • 2 टीस्पून सोया साॅस
 • 1 टीस्पून ग्रीन चिली साॅस
 • 1 टीस्पून वीनेगर
 • तेल
 • गरम मसाला चवीनुसार
 • 2 टीस्पून आल लसूण पेस्ट
 • 2 टीस्पून काॅरन फलोवर ची पेस्ट
 • कोथिंबीर

ड्राय ब्रेड मनचुरियन | How to make Dray Bread Manchurian Recipe in Marathi

 1. ब्रेड मिक्सर मधून बारीक करून घ्या
 2. एका वाडग्यात ब्रेडचा चूरा खिसलेली कोबी गाजर काॅनॆ फलोवर लाल तिखट हळद मीठ आणि पाणी घालून चांगल मळून घ्याव.
 3. आता छोटे छोटे गोळे बनवा.
 4. पॅन मध्ये तेल टाकून मंद आचेवर खमंग तळून घ्या.
 5. आता दुसर्या पॅन मध्ये तेल टाकून जीरे काळे मिरे आल लसूण पेस्ट ची फोडणी दया. .
 6. त्यात कांदा परतवून घ्या. .सिमला मिरची परतवून घ्या. .
 7. नंतर त्यात टोमॅटो साॅस सोया साॅस ग्रीन चिली साॅस आणि वीनेगर घालून हलवा.
 8. नंतर त्यात तळलेले गोळे घालून हलवा. .
 9. नंतर त्यात लाल तिखट गरम मसाला आणि चवीपुरत मीठ घालून चांगल हलवा.
 10. थोडा पाण्याचा शिपका मारा ..5 मी.झाकण ठेवून शिजवा..
 11. आणि कोथिंबीर घालून सर्व करा. ..

My Tip:

मी फक्त कोबी आणि गाजर घातलंय तुम्ही ईतर फळ भाजी वापरू शकता. .

Reviews for Dray Bread Manchurian Recipe in Marathi (0)