वडा पाव | Potato Fritters with Bread Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  20th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato Fritters with Bread recipe in Marathi,वडा पाव, Priti Tara
वडा पावby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

वडा पाव recipe

वडा पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Fritters with Bread Recipe in Marathi )

 • ५-६ उकडलेले बटाटे
 •  लसूण चा १अख्खा कांदा + १/दीड इंच आलं + ६-७ हिरवी  मिरची 
 • कोथिंबीर बारीक चिरून अर्धी वाटी
 • ६-७  कढीपत्ता पाने
 • १  टीस्पून मोहरी
 • १/४ टीस्पून हिंग
 • १/दीड टीस्पून गरम मसाला
 • १ /दीड टीस्पून हळद
 • फोडणीसाठी तेल ४-५ चमचे
 • मीठ चवीप्रमाणे
 • लादी पाव ,
 • वड्याच्या कव्हरसाठी-
 • २ वाटी बेसन
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • मीठ चवीप्रमाणे
 • १/४ टीस्पून हळद (ऐच्छिक आह.. मी हळद वापरत नाही.)

वडा पाव | How to make Potato Fritters with Bread Recipe in Marathi

 1. उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. 
 2. आलं-लसूण आणि हिरव्या मिरची खलबत्त्या मधून वाटून घ्या.
 3. कढईत फोडणी साठी तेल गरम करा. त्यामध्ये हिंग, मोहरी व कढीपत्त्याची फोडणी करा.
 4. त्यात आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीच वाटण घाला. त्यामध्ये हळद , गरम मसाला व मीठ घालून परतावे .
 5. त्यानंतर त्यामध्ये कुस्करलेला बटाटा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. वरून चिरलेली कोथिंबीर घाला व भाजी पुन्हा परता.
 6. भाजी एका ताटात काढून हाताने मिक्स करून पुन्हा कढईत घालून परता .
 7. तयार भाजी ताटात काढून घ्या, आणि त्याचे समान चपटे गोळे करा.
 8. वड्याच्या कव्हर साठी-   
 9. बेसन घ्या. त्यात मीठ आणि बेताचे पाणी घालून एकजीव करा.
 10. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको.चमच्याने वरून खाली टाकून बघा. तार यायला पाहिजे.
 11. लागल्यास आणखीन पाणी घाला. बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
 12. वडे तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या. तेल तापले कि बॅटरमध्ये सारणाचा गोळा बुडवून तेलात सोडा.वडे सोडायच्या आधी बोटाने बॅटरचा छोटा थेंब तेलात टाका. तो लगेच तळून आला कि तेल तापले आहे असे समजावे. वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
 13. तयार वडे किचन पेपर मध्ये काढून घ्या. पावामध्ये चिंचेची गोड चटणी आणि तिखट चटणी लावून किंवा टोमॅटो साँस, मिरचीची भरड तिखट चटणी किंवा पावाची तिखट सूकि चटणी व बेसन मधे तळलेल्या मिरच्यां बरोबर गरम गरम बटाटे वडे खायला द्या.
 14. मी २ फोटो पोस्ट केले आहेत. दोन्ही मीच बनविल्या आहेत. दुसऱ्या फोटो मधील त्याच भाजीपासून ब्रेड पॅटिस बनविले आहेत. भाजी ब्रेड मध्ये भरून ब्रेड पॅटिस ही बनवू शकतो.
 15. त्याचबरोबर त्या भाजीमध्ये मिरची पावडर व निंबूसाद किंवा आमचूर पावडर घालून मोठ्या मिरच्यांमध्ये ती भाजी भरून मिरची वडे ही तळून बनवू शकता.
 16. भाजी जर का उरली तर दुसऱ्या दिवशी नाश्त्यामध्ये त्या भाजीपासून आलू पराठे ही बनवू शकता.

My Tip:

हीच भाजी ब्रेड मध्ये भरून ब्रेड पॅटिस ही बनवू शकता.

Reviews for Potato Fritters with Bread Recipe in Marathi (0)