खुसखुशीत मटार करंजी | Green piece Karanji Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green piece Karanji recipe in Marathi,खुसखुशीत मटार करंजी, Bharti Kharote
खुसखुशीत मटार करंजीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

3

0

खुसखुशीत मटार करंजी recipe

खुसखुशीत मटार करंजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green piece Karanji Recipe in Marathi )

 • पाव किलो मटार
 • एक नारळ
 • 9/10 हिरव्या मिरच्या
 • एक छोटी जूडी कोथिंबीर
 • एक चमचा गोडा मसाला
 • एक चमचा गरम मसाला
 • एक चमचा लाल तिखट
 • एक चमचा आल लसूण पेस्ट
 • दोन चमचा खसखस
 • तीन चमचा तीळ
 • दोन चमचा पीठी साखर
 • तूप
 • तेल
 • जीरे पूड
 • धने पुड
 • मीठ
 • तीन वाटी मैदा
 • अर्धी वाटी रवा
 • पाणी आवश्यकतेनुसार

खुसखुशीत मटार करंजी | How to make Green piece Karanji Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मैदा घेऊन त्यात अर्धीवाटी तूपाचे मोहन घालावे...
 2. किंचित मीठ रवा आणि पाणी घालून चांगल मळून घ्याव. .
 3. 15 मी.त्या वर पांढरा कपडा ओला करून झाकून ठेवा
 4. मटार स्वच्छ धूऊन 10मी.ऊकडून घ्या. .
 5. पॅन मध्ये तेल टाकून जीरे पूड हिरवी मिरची आल लसूण पेस्ट खसखस तीळ खोवलेलया नारळा चा खीस परतवून घ्या. ..
 6. त्यात मटार धने पुड गोडा मसाला लाल तिखट घाला. .
 7. साखर गरम मसाला चवीनुसार मीठ घाला. .
 8. हे सगळं चांगल परतवून घ्या. ..
 9. त्यात कोथिंबीर घालून हे सारण गार होण्यासाठी ठेवून द्या. ....
 10. आता आपण मळून ठेवलेल्या कणकेच्या लाटया करून घेवू....
 11. लाटया घेऊन छोट्या पूरया लाटा आणि त्यात सारण भरा...
 12. सारण पूरी च्या अंदाजाप्रमाणे भरावे. ..
 13. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
 14. सारण भरलेल्या पूरीला करंजी चा आकार दया. .
 15. बोटांचया साहाय्याने दोन्ही बाजूंनी चांगले पॅक करा. .
 16. तेल तापल्यावर मध्यम आचेवर खमंग करंजी तळून घ्या. ..
 17. आणि टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

तुम्ही यात ड्रायफ्रूटस पण घालू शकता. .

Reviews for Green piece Karanji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo