सोयाबीन पकोड़ा | Soyabin Pakoda Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Soyabin Pakoda recipe in Marathi,सोयाबीन पकोड़ा, Vaishali Joshi
सोयाबीन पकोड़ाby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

6

0

सोयाबीन पकोड़ा recipe

सोयाबीन पकोड़ा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soyabin Pakoda Recipe in Marathi )

 • सोयाबीन वड्या १०० ग्राम
 • कॉर्न फ्लोर ३-४ चमचे
 • रवा ३-४ चमचे
 • लसूण मिर्ची कोथिंबीर जीर यांची पेस्ट २-३ चमचे
 • लिंबू रस २-३ चमचे
 • तिखट १ चमचा
 • हळद १/४ चमचा
 • धणे जीरे पावडर १ चमचा
 • मीठ

सोयाबीन पकोड़ा | How to make Soyabin Pakoda Recipe in Marathi

 1. उकळत्या पाण्यात मीठ टाकून त्यात सोयाबीन वड्या ५ मिनिट ठेवा .बाहेर काढून थंड पाण्यात टाका आणि पिळुन घ्या , बाऊल मधे ठेवा
 2. त्यात लसूण मिर्ची जीरे कोथिंबिरिचा ठेचा टाका , तिखट , हळद , धणे जीरे पावडर , मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा .थोडा वेळ तसेच झाकून ठेवा
 3. ५ मिनीटानी त्यात रवा आणि कॉर्न फ्लोर टाकून हलकेच टॉस ( मिक्स ) करा . गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून बाहेर काढ़ा
 4. गरम गरम सोयाबीन पकोड़े सॉस बरोबर सर्व्ह करा

Reviews for Soyabin Pakoda Recipe in Marathi (0)