मसाला आणि दह्यात लहान बटाटे म्हणजे दम आलू | Baby Potatoes in Spices & Yogurt aka Dum Aloo Recipe in Marathi

प्रेषक Sanjeeta KK  |  13th Aug 2015  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Baby Potatoes in Spices & Yogurt aka Dum Aloo by Sanjeeta KK at BetterButter
मसाला आणि दह्यात लहान बटाटे म्हणजे दम आलू by Sanjeeta KK
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  50

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

11203

1

मसाला आणि दह्यात लहान बटाटे म्हणजे दम आलू recipe

मसाला आणि दह्यात लहान बटाटे म्हणजे दम आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Baby Potatoes in Spices & Yogurt aka Dum Aloo Recipe in Marathi )

 • 12-15 लहान बटाटे (बेबी पोटॅटो)
 • दीड कप दही
 • 3 मोठे चमचे तेल
 • अर्धा लहान चमचा साखर
 • एक चिमूटभर हिंग
 • मीठ चवीनुसार
 • पाणी
 • अर्धा इंच सुंठ
 • 1 मोठा चमचा बडीशेप
 • 1 मोठा चमचा धणे
 • 1 लहान चमचा जिरे
 • 1 लहान चमचा मिरे
 • 4 लवंगा
 • 2 काळे वेलदोडे
 • 4 काश्मिरी लाल मिरच्या

मसाला आणि दह्यात लहान बटाटे म्हणजे दम आलू | How to make Baby Potatoes in Spices & Yogurt aka Dum Aloo Recipe in Marathi

 1. लहान बटाट्यांना स्वच्छ धुवा आणि अर्धे कच्चे पक्के उकडावा किंवा एका मोठ्या पॅनमध्ये पाणी भरून त्यात अर्धवट शिजवा.
 2. एका दुसऱ्या भांड्यात थंड पाणी घेऊन या अर्धवट शिजलेल्या बटाट्यांना घाला आणि थंड होऊ द्या.
 3. नंतर बटाट्यांना सोला आणि काट्याने त्यांना छिद्र करा.
 4. एका पॅन गरम करा आणि त्यात धणे, जिरे, काळे वेलदोडे, मिरे, बडीशेप आणि सुकलेल्या लाल मिरच्या 1 मिनिटापर्यंत भाजून घ्या.
 5. या भाजलेल्या साहित्याला वेलदोडा आणि सुंठीबरोबर मिक्सरमध्ये दळून घ्या.
 6. एक सपाट पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा आणि बटाटे गुलाबी रंगाचे होईपर्यंत तेलावर परता. तुम्ही त्यांना कुरकुरीत बनविण्यासाठी तेलात तळूपण शकता.
 7. नंतर बटाट्यांना काढून टिश्यू पेपरवर तेल निथळण्यासाठी ठेवा.
 8. एक पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात हिंग घाला.
 9. दळलेल्या मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा पाणी घालून एका पॅनमध्ये 2 मिनिटे शिजवा.
 10. दही व्यवस्थित फेटा आणि पॅनमध्ये ओता.
 11. साखर (ऐच्छिक) आणि परतलेल्या बटाट्यांना या पॅनमध्ये घाला, झाकण लावून मध्यम आचेवर 10-15 मिनिटे शिजवा. नंतर मीठ घाला.
 12. याला रस्सा घट्ट होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत शिजवा. या वेळी तुम्ही एका गरम तव्यावर रश्याला 'दम' देखील देऊ शकता.
 13. नंतर तव्यावर ठेवलेल्या या रश्याला झाकून मंद आचेवर 15 मिनिट शिजवा.
 14. आता गॅस बंद करा आणि दम आलू करीला भात किंवा पोळीबरोबर गरम गरम वाढा.

My Tip:

मोहरीचे तेल किंवा शेंगदाण्याच्या तेलात केले, तर उत्कृष्ट परिणाम मिळतो.

Reviews for Baby Potatoes in Spices & Yogurt aka Dum Aloo Recipe in Marathi (1)

सोनल बुरसे8 months ago

खुपच छान
Reply

Cooked it ? Share your Photo