तळलेली कारली | Fried bitter gourds Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried bitter gourds recipe in Marathi,तळलेली कारली, Susmita Tadwalkar
तळलेली कारलीby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

7

0

तळलेली कारली recipe

तळलेली कारली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried bitter gourds Recipe in Marathi )

 • ५-६ छोटी कारली
 • २ बारिक चिरलेले कांदे
 • पाऊण वाटी तेल
 • तिखट, मिठ आवडीप्रमाणे
 • १/२ चमचा धणे-जिरे पावडर
 • पाव चमचा गरम मसाला
 • १/२ चमचा‌काळा किंवा दुसरा एखादा मसाला
 • आवडत असल्यास १/४ चमचा आमचूर पावडर
 • मुठभर बारिक चिरलेली कोथिम्बीर

तळलेली कारली | How to make Fried bitter gourds Recipe in Marathi

 1. कारली धुवून हलक्या हातानी वरची सालं किसून घ्या
 2. आता त्याला एक चिर देऊन आतल्या बिया काढून टाका
 3. पाण्यात १/२ चमचा मिठ घाला
 4. त्यात कारली १५-२० मिनिटं भिजत ठेवा
 5. पाण्यातून काढून घ्या
 6. घट्ट दाबून पाणी काढून कोरडी करा
 7. तेल गरम करून घ्या व त्यात मध्यम आंचेवर कारली तळून घ्या
 8. कारली बाजूला ठेवा
 9. जास्तीचं तेल काढून घ्या
 10. आता तेलावर बारिक चिरलेला कांदा घाला
 11. कांदा परतून झाल्यावर त्यात तिखट, मिठ, बाकी मसाले, आमचूर पावडर व बारिक चिरलेली कोथिम्बीर घाला
 12. गॅस बंद करा व मसाला निट मिसळून घ्या
 13. हा मसाला कारल्यांमध्ये भरा
 14. सगळी कारली एका बाउल मध्ये ठेवून २ मिनिटं मायक्रोवेव करा
 15. दहीभात किंवा पराठ्याबरोबर खायला द्या

My Tip:

कारल्याची किसलेली सालं कांद्यावर परतून पण भाजी करू शकता

Reviews for Fried bitter gourds Recipe in Marathi (0)