मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले भटूरे बाइट्स

Photo of Chhole Bhature Bites by Sonia Kriplani at BetterButter
507
4
0.0(0)
0

छोले भटूरे बाइट्स

Jun-24-2018
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
61 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले भटूरे बाइट्स कृती बद्दल

मी छोले भटूरे ला एक नवीन रूप देऊन बाइट्स बनोले आहेत ।तळलेले पदार्थ जास्त भारी वाटू नये ।म्हणून छोटे छोटे चोरस शेप दिला आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा। 2 कप
  2. मीठ आवश्यक्तेप्रमाणे
  3. बटाटा एक
  4. दही 1 वाटी
  5. साखर 1 छोटा चमचा
  6. बटर 2चमचे
  7. उकळलेले छोले 2वाट्या
  8. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  9. जीरं पावडर 2चमचे
  10. धणे पावडर 2चमचे
  11. तिखट हळद मीठ आवश्यक्तेप्रमाणे
  12. गरम मसाला 3 चमचे
  13. हिरवी मिर्ची 2
  14. कोथिंबीर 3 ते 4 दांड्या
  15. सजवण्या साठी
  16. टमाटा 1
  17. कांदा । 1

सूचना

  1. मैदा मध्ये एक बटाटा किसून टाका
  2. मग दही मीठ साखर पावडर टाका
  3. चांगल्याने पीठ मळून घ्या
  4. घट्ट पीठ मळून झाकण लाऊन ठेवा
  5. एका कढईत तेल टाका
  6. आता एका वाटीत धणेजीर पावडर तिखट,हळद ,मीठ गरम मसाला टाका
  7. आलं लसूण पेस्ट वाटीत टाका तीन ते चार चमचे पाणी टाका
  8. आता सगडे जिन्नस चांगल्याने मिक्स करा
  9. कढईत तेल तापल्यावर हे मिश्रण टाका
  10. उकळलेले छोले टाका
  11. पाणी सूखे पर्यंत हलवत राहा
  12. आता गॅस बन्द करा
  13. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये टाकून पेस्ट तयार करा
  14. आता मैद्याची पारी लाटून चौरस शेप कटर ने कापा
  15. ह्याला मंद आचेवर तळून घ्या
  16. आता छोले चा बनवलेला पेस्ट आईसिंग च्या पाऊच मध्ये टाका
  17. स्टार नोझल टाका
  18. आणि फोटो प्रमाणे चौकोर तळलेला बाईट वर आईसिंग सारख राऊंड बनवा
  19. आणि डेकोरेट करा
  20. तयार आहे छोला भटूरे बाइट्स।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर