Photo of Aappe by Aarya Yandex at BetterButter
749
6
0.0(0)
0

आप्पे

Jun-25-2018
Aarya Yandex
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आप्पे कृती बद्दल

लहान पासून मोठ्या खवेैय्यासाठी चविष्ट पदार्थ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ १ वाटी
  2. उदीडडाळ १/२ वाटी
  3. चणाडाळ पाव वाटी
  4. मुठभर पोहे
  5. मिरची-लसून पेस्ट १/२ चमचा
  6. चवीनुसार मिठ
  7. साखर १ चमचा

सूचना

  1. तांदूळ व डाळी वेगवेगळ्या भिजत घालणे.
  2. साधारण १० तास भिजवणे. भिजल्यावर कमी पाण्यात मिक्सर मध्ये वाटून घेणे . पोहे धुवून मिक्सर मध्ये वाटून घेणे . (सदर मिश्रण इडलीच्या पीठाप्रमाणे consistent असावे)
  3. सर्व मिश्रण एकजीव करणे. त्यात मिठ, मिरची- लसुण पेस्ट व साखर मिक्स करून १० मिनिट झाकून ठेवणे.
  4. १० मिनिटानंतर आप्पे पाञ गँस वर तापायला ठेवणे (फेल्म बारीक/मध्यम ठेवावी). आप्पे पाञास तेल लावून चमच्याने पीठ सोडावे. पुन्हा थोड तेल सोडून झाकण ठेवावे.
  5. अदांजे २-३ मिनिटांनी झाकण काढून साधारण सोनेरी झाल्यावर आप्पे चम्मच्याने उलटून दुस-या बाजूने (पुन्हा वाफून) भाजून घ्यावेत.
  6. गरमा-गरम आप्पे खोब-याच्या चटणी सोबत खाण्यसाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर