मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंपल्यांचे कटलेट्स

Photo of Clames cutlets by Nutan Sawant at BetterButter
835
3
0.0(0)
0

शिंपल्यांचे कटलेट्स

Jun-25-2018
Nutan Sawant
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंपल्यांचे कटलेट्स कृती बद्दल

शिंपल्यांचे कटलेट- (Clam's Cutlate) मासेखाऊंसाठी शिंपल्यांचे पदार्थ ही एक नजाकत,तर नव्याने मासे खाणाऱयांसाठी,शिंपल्ल्या म्हणजे बिनधास्त खाता येणारा बिनकाट्यांचा मत्स्यप्रकार. नुसतेे उकडून खाल्ले तरी चविष्ट लागणार.मीठसुद्धा घालायची गरज नाही. मुळात इतके चविष्ट असताना त्यावर मीठमसल्याचेसंस्कार झाल्यावर पाहायलाच नकोत. समुद्रकिनाऱ्यावरच्या,आद्य सुगरणींनी त्यांची कल्पकता दाखवून वेगवेगळे रश्श्यांचे प्रकार,तसेच सुके, डांगर(वड्या),इ.प्रकारांनी त्यांची चव वाढवलीच. यातलाच एक प्रकार म्हणजे कटलेट,इंग्रज भारतातून गेले तरी त्यांच्या कटलेटची वेगवेगळी रूपांतरे होत राहिली आहेत खवय्यांच्या दुनियेत.हा एक प्रकार माझ्या हातचा तुम्हीही चाखून पहा. घ्या तर साहित्य गोळा करायला.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी शिंपल्या उकडून काढलेले मांस
  2. दोन उकडलेले बटाटे,कुक्सरून
  3. अर्धी वाटी राव किंवा ब्रेडकम्ब
  4. अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  5. एक चहाचा चमचा लाल मिरची पूड
  6. एक चमचा धणेपूड
  7. एक चमचा गरम मसालापूड
  8. एक हिरवी मिरची बारीक चिरून
  9. अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  10. एक छोटा कांदा बारीक चिरुन
  11. एक चहाचा चमचा आले लसूण पेस्ट
  12. मीठ चवीनुसार
  13. अर्ध्य लिंबाचा रस
  14. तेल डीप,शॅलो किंवा एअरफ्राय करण्यासाठी लागेल तसे

सूचना

  1. रवा किंवा ब्रेडकम्ब,तेल आणि मीठ बगळुन सर्व पदार्थ एकत्र करा.
  2. चव पाहून मीठ घाला,कारण शिंपल्या मूळच्या खारट असतात.
  3. आवडतील तसे गोल,लांबट किंवा हृदयाकृती आकार देऊन चाट कटलेट्स पाण्याच्या हाताने वळून घ्या.
  4. रव्यात किंवा ब्रेडकम्बमध्ये घोळवून डीप ,शॅलो कीं एअरफ्रायरमध्ये तळून घ्या.
  5. चटणीसोबत लिंग टोमॅटो सॉस सोबत आस्वाद घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर