नमकीन मठरी | Namkin Mathari Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  25th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Namkin Mathari recipe in Marathi,नमकीन मठरी, Deepa Gad
नमकीन मठरीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

नमकीन मठरी recipe

नमकीन मठरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Namkin Mathari Recipe in Marathi )

 • १ कप मैदा
 • २ च तूप
 • चवीनुसार मीठ
 • पाव च ओवा
 • तळण्यासाठी तेल
 • पेस्टसाठी १ च मैदा, १ च पाणी
 • लवंगा

नमकीन मठरी | How to make Namkin Mathari Recipe in Marathi

 1. बाऊलमध्ये मैदा, मीठ, ओवा, तूप घालून हाताने चोळून घ्या,
 2. थोडं थोडं पाणी घालून मऊसर मळून घ्या
 3. १० मिनिटे झाकून ठेवा
 4. त्या पिठाचे ४ गोळे करा
 5. सर्व गोळे पातळसर लाटून घ्या व त्याला कापून चौकोणी आकार द्या
 6. प्रत्येक पोळी तव्यावर मंद गॅसवर थोडीशी भाजून घ्या
 7. त्या चारही पोळ्या एकावर एक ठेवून एका बाजूच्या कडा मैद्याच्या पेस्टने चिकटवा
 8. नंतर गुंडाळून कडा चिकटवा
 9. त्याचे तिरकस तुकडे कापा
 10. मध्ये बोटाने आतला भाग पुढे सुटा करत जा
 11. तिथे लवंग दाबा म्हणजे पदर सुटणार नाहीत
 12. तेलात तळा कुरकुरीत होईपर्यंत
 13. लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने तळा
 14. चहाबरोबर सर्व्ह करा

My Tip:

तुम्हाला आवडत असेेल तर त्यात जिरेपुडही घालू शकता

Reviews for Namkin Mathari Recipe in Marathi (0)