फ्रेंच फ्राईज | French Fries Recipe in Marathi

प्रेषक Sujata Limbu  |  13th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of French Fries by Sujata Limbu at BetterButter
फ्रेंच फ्राईजby Sujata Limbu
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2153

0

Video for key ingredients

 • Homemade Mayonnaise

फ्रेंच फ्राईज recipe

फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make French Fries Recipe in Marathi )

 • 3 मोठ्या आकाराचे बटाटे
 • आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल
 • मीठ स्वादानुसार
 • टोमॅटो कॅचप आणि मेयोनीज (बुडविण्यासाठी)

फ्रेंच फ्राईज | How to make French Fries Recipe in Marathi

 1. एक स्टीलचा वाडगा घ्या आणि त्यात बटाट्यांना पुरेल इतके पाणी उकळवा.
 2. पाणी उकळायला लागले की त्यात बटाटे घाला. गॅस बंद करून उकळत्या पाण्यात बटाटे 6 ते 7 मिनिटांसाठी राहू द्या
 3. या कालावधीनंतर, बटाट्यातील पाणी काढून टाका आणि बटाटे पुसून घ्या. एकानंतर एक बटाटे सोला आणि त्याचे लांब काप करा.
 4. एक कढई घ्या. त्यात तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल घ्या. त्यात 1 मिनिटासाठी बटाट्याचे काप तळा.
 5. नंतर आच कमी करा आणि बटाटे शिजेपर्यंत तळा. टीप तळताना त्यांचा रंग अधिक बदलला जाऊ नये.
 6. एकदा शिजले की, त्यांना एका ताटात काढा आणि त्यातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी पेपर टॉवेल किंवा टिश्यु पेपर वापरा.
 7. वाढण्याअगोदर, बटाट्याचे काप पुन्हा मोठ्या आचेवर कुरकुरीत आणि हलक्या तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा.
 8. स्वादानुसार त्यावर मीठ लावा.
 9. इच्छेनुसार टोमॅटोचे सॉस, कॅचप आणि मेयोनीजबरोबर गरमागरम वाढा.

Reviews for French Fries Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo