मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेंच फ्राईज

Photo of French Fries by Sujata Limbu at BetterButter
28484
392
4.9(0)
4

फ्रेंच फ्राईज

Aug-13-2015
Sujata Limbu
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेंच फ्राईज कृती बद्दल

कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल असे हे फ्रेंच फ्राईज बनवायला अगदी सोपे आणि खाण्यासाठी चविष्ट असतात. या दिश्वर तुटून पडायला आपल्याळा निश्चितच कोणतेही कारण लागत नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • युरोपिअन
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 मोठ्या आकाराचे बटाटे
  2. आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल
  3. मीठ स्वादानुसार
  4. टोमॅटो कॅचप आणि मेयोनीज (बुडविण्यासाठी)

सूचना

  1. एक स्टीलचा वाडगा घ्या आणि त्यात बटाट्यांना पुरेल इतके पाणी उकळवा.
  2. पाणी उकळायला लागले की त्यात बटाटे घाला. गॅस बंद करून उकळत्या पाण्यात बटाटे 6 ते 7 मिनिटांसाठी राहू द्या
  3. या कालावधीनंतर, बटाट्यातील पाणी काढून टाका आणि बटाटे पुसून घ्या. एकानंतर एक बटाटे सोला आणि त्याचे लांब काप करा.
  4. एक कढई घ्या. त्यात तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल घ्या. त्यात 1 मिनिटासाठी बटाट्याचे काप तळा.
  5. नंतर आच कमी करा आणि बटाटे शिजेपर्यंत तळा. टीप तळताना त्यांचा रंग अधिक बदलला जाऊ नये.
  6. एकदा शिजले की, त्यांना एका ताटात काढा आणि त्यातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी पेपर टॉवेल किंवा टिश्यु पेपर वापरा.
  7. वाढण्याअगोदर, बटाट्याचे काप पुन्हा मोठ्या आचेवर कुरकुरीत आणि हलक्या तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा.
  8. स्वादानुसार त्यावर मीठ लावा.
  9. इच्छेनुसार टोमॅटोचे सॉस, कॅचप आणि मेयोनीजबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर