मोरपंख निमकी | Morpankh Nimki Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  26th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Morpankh Nimki recipe in Marathi,मोरपंख निमकी, Deepa Gad
मोरपंख निमकीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

मोरपंख निमकी recipe

मोरपंख निमकी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Morpankh Nimki Recipe in Marathi )

 • १ कप मैदा
 • काळं मीठ चिमूटभर
 • साधं मीठ पाव च
 • लाल मिरची क्रश १/२ च
 • ओवा पाव च
 • तूप/ तेल ४ च
 • आवश्यकतेनुसार पाणी
 • तळण्यासाठी तेल

मोरपंख निमकी | How to make Morpankh Nimki Recipe in Marathi

 1. मैदा, काळं मीठ, साधं मीठ, लाल मिरची क्रश, ओवा, तूप किंवा तेल घालून हाताने चोळून घ्या
 2. मुठीत घेऊन दाबलं तर गोळा व्हायला पाहिजे
 3. नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळा
 4. त्या पिठाचे २ भाग करून लाटून घ्या
 5. सुरीने कापून चौकोन करा
 6. त्याचे उभे तीन भाग कापा
 7. मध्ये एक आडवा भाग कापा म्हणजे त्याचे आयताकृती ६ भाग होतील
 8. प्रत्येकावर मैदा भुरभुरा व दुमडा आणि सुरीने किंवा शंकरपाळीच्या कटरने दुमडलेल्या खालच्या बाजूला लाईनमध्ये कापा
 9. दुमडलेली बाजू उघडा व तिरकस टोक पाणी लावून चिकटवा,
 10. बाकीच्या दोन टोकापैकी एक टोक पहिल्या चिकटवलेल्या भागावर गोल फिरवून दाबा
 11. शेवटचे टोकही एकत्र तिथेच फिरवून दाबा
 12. पलटी मारून पहा मोरपंखाचा आकार तयार होईल ( मी विडिओ काढला आहे पण इथे अगोदर काढलेला असल्यामुळे टाकता येत नाही)
 13. सर्व मोरपंख बनवून घ्या
 14. तेलात लालसर होईपर्यंत तळा
 15. मस्त खुसखुशीत मोरपंख निमकी तयार आहे

My Tip:

खुसखुशीतपणा येण्यासाठी पिठात तूप/ तेल टाकल्यानंतर दोन्ही हाताने पीठ चोळून घ्या

Reviews for Morpankh Nimki Recipe in Marathi (0)