मुख्यपृष्ठ / पाककृती / Crispy Cheesy Veg Spring Roll

Photo of Crispy Cheesy Veg Spring Roll by Deepa Gad at BetterButter
1222
4
0.0(1)
0

Crispy Cheesy Veg Spring Roll

Jun-26-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. स्प्रिंग रोल पट्टीसाठी :
  2. मैदा १ कप
  3. कॉर्नफ्लोर पाव कप
  4. मीठ १/२ च
  5. तेल ४ च
  6. पाणी आवश्यकतेनुसार
  7. सारणासाठी:
  8. सिमला मिरची १
  9. गाजर १
  10. कोबी १ मोठा बाउल
  11. लसूण पाकळ्या ६-७
  12. हिरवी मिरची ३
  13. कांदा १
  14. सोया सॉस २ च
  15. चिली सॉस १ च
  16. मीठ चवीनुसार
  17. चीझ आवडीनुसार
  18. पेस्टसाठी :
  19. मैदा १ च
  20. पाणी १ च

सूचना

  1. स्प्रिंग रोल पट्टीसाठी :
  2. मैदा, मीठ, तेल घालून चांगलं हाताने एकजीव करा
  3. थोडं थोडं पाणी घालून मळा
  4. त्या पिठाचे ९ गोळे करा
  5. सर्व गोळे जाडसर लाटून घ्या
  6. एक पोळी घेऊन त्यावर तेल/तूप लावा त्यावर मैदा भुरभुरा
  7. त्यावर दुसरी पोळी ठेवा त्यावरही तुप व मैदा टाकून तिसरी पोळी ठेवा
  8. व ह्या तीन पोळ्या एकत्र मैदा लावून अलगद लाटून मोठया करा
  9. तव्यावर मंद आचेवर पोळी घालून ३० सेकंद फक्त दोन्ही बाजूने भाजा
  10. भाजल्यानंतर लगेच एकीकडे गरम असतानाच त्या तीन पोळ्या अलग करा
  11. अशाप्रकारे सर्व पोळ्या अलग करून त्यावर कपडा घालून ठेवा
  12. सारण :
  13. सर्व भाज्या व कांदा उभ्या चिरून घ्या, लसूण बारीक चिरा
  14. पॅनवर तेल घालून त्यात लसून चिरलेला परतून मग एकेक करून सर्व भाज्या, कांदा घाला
  15. चांगल्या परतून घ्या, मीठ घाला
  16. सोया सॉस, चिली सॉस घाला, एकजीव करा
  17. हे झाले सारण तयार
  18. वरील एक पोळी (पट्टी) घेऊन त्यावर एका बाजूला सारण घाला त्यावर चीझ किसून घाला
  19. डाव्या व उजव्या बाजूच्या कडा सारणावर दुमडा नंतर खालून सारणावर गुंडाळा, वरती मैद्याची पेस्ट लावून चिकटवा
  20. अश्या प्रकारे सर्व करून घ्या व तेलात मध्यम आचेवर तळा
  21. मस्त गरमा गरम चिझी व्हेज स्प्रिंग रोल शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Loke
Jun-26-2018
Madhavi Loke   Jun-26-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर