चीझ स्टफ कॉर्न पॅटिस | Cheese Stuffed Corn Pattice Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheese Stuffed Corn Pattice recipe in Marathi,चीझ स्टफ कॉर्न पॅटिस, Deepa Gad
चीझ स्टफ कॉर्न पॅटिसby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

चीझ स्टफ कॉर्न पॅटिस recipe

चीझ स्टफ कॉर्न पॅटिस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese Stuffed Corn Pattice Recipe in Marathi )

 • मक्याचे दाणे वाफवलेले १ मोठा बाउल
 • कांदा १ मोठा
 • टोमॅटो १/२
 • तिखट १ च
 • चाट मसाला १ च
 • चीझ १ वडी
 • मीठ चवीनुसार
 • रवा १ वाटी
 • पाणी २ वाट्या
 • तूप २ च

चीझ स्टफ कॉर्न पॅटिस | How to make Cheese Stuffed Corn Pattice Recipe in Marathi

 1. सारणासाठी : मक्याचे दाणे वाफवून घ्या नंतर मिक्सरला जाडसर वाटून घ्या
 2. कढईत तेलात चिरलेला कांदा व टोमॅटो मऊ होईपर्यंत परता
 3. आलं- लसून पेस्ट घाला
 4. क्रश केलेले मक्याचे दाणे, तिखट, मीठ, चाट मसाला घालून एकजीव करा
 5. हे झालं सारण तयार
 6. पारीसाठी :
 7. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा त्यात मीठ व थोडं तूप घाला
 8. चांगली उकळी आली की त्यात रवा घालून ढवळा, उकड काढा, झाकण ठेवून एक वाफ येवू द्या मग गॅस बंद करा
 9. परातीत काढून हाताला तूप लावून मऊसर मळून घ्या, गुठळ्या राहता कामा नये
 10. त्याचे ६ गोळे करा
 11. गोळ्याची पारी करा तुपाचा हात लावून
 12. त्यात सारण भरा मधेच चीझचा तुकडा घाला व बंद करून चिकटवा
 13. डिशमध्ये थोडा रवा घेऊन त्यात घोळवा
 14. तेलात घालून तळा
 15. हिरवी चटणी, टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा
 16. झालें आपले कॉर्न पॅटीस तयार

My Tip:

उकड काढताना रवा जाडा असेल तर पाणी दुप्पट घाला आणि रवा बारीक असेल तर पाणी तेवढंच घ्या

Reviews for Cheese Stuffed Corn Pattice Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo