बटाटा नेस्ट | Potatoes Nest Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  29th Jun 2018  |  
5 from 4 reviews Rate It!
 • Potatoes Nest recipe in Marathi,बटाटा नेस्ट, deepali oak
बटाटा नेस्टby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

4

बटाटा नेस्ट recipe

बटाटा नेस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potatoes Nest Recipe in Marathi )

 • मध्यम बटाटे ६/७ ऊकडुन
 • गाजर किसुन १
 • कांदा किसून १
 • शिमला मिरची १ चीरुन
 • लिंबूरस १ चमचा
 • मक्याचे पीठ २ चमचे
 • आले लसूण मिरची पेस्ट २ चमचे
 • धणे जीरे पावडर १ चमचा
 • काळीमीरी पावडर पाव चमचा
 • तिखट मीठ हळद
 • मैदा अर्धी वाटी
 • तांदूळपीठ अर्धीवाटी
 • गव्हाच्या किंवा बाॅम्बीनो शेवया १ वाटी
 • पनीर पाव वाटी
 • तळणीसाठी तेल
 • कोथिंबीर एकवाटी चीरून
 • पाणी

बटाटा नेस्ट | How to make Potatoes Nest Recipe in Marathi

 1. एका ताटात ऊकडलेले बटाटे कुस्करुन घ्या
 2. त्यात कांदा,गाजर,शिमला मीरची,घाला
 3. आले लसूण मिरची पेस्ट व तिखट मीठ हिंग हळद आणि धणेजिरे पावडर व काळीमीरी पावडर घाला
 4. लिंबू रस व कोथिंबीर आणि २ चमचे काॅर्न फ्लॉवर घालून मळा
 5. आता ह्याचे लहान वडे थापून नेस्ट चा आकार दया व बाजूस ठेवा
 6. आता मैदा व तांदूळपीठ व मीठ घालून अर्धीवाटी पाणी घालून पेस्ट तयार करा
 7. आता तयार केलेला वडा ह्या पेस्ट मध्ये घोळवून मग त्याला शेवया लावा
 8. शेवया नीट सगळी कडून लावा
 9. आता हे तेलात डीप फ्राय करा
 10. आता ताटात पनीर व हलके मीठ घालून छान मळून घ्या व लहान अंडी बनवा
 11. तळलेल्या नेस्टवर कोथिंबीर घालून हि पनीरची अंडी त्यावर ठेवा
 12. तिखट चटणी किंवा साॅस सोबत खाऊ घाला

Reviews for Potatoes Nest Recipe in Marathi (4)

Ujwala Nirmale5 months ago

Wow
Reply

Madhavi Loke5 months ago

Ummmnaa
Reply

Nayana Palav5 months ago

Superb
Reply

Poonam Nikam5 months ago

wow
Reply