Photo of Potatoes Nest by deepali oak at BetterButter
714
13
5.0(4)
0

Potatoes Nest

Jun-29-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मध्यम बटाटे ६/७ ऊकडुन
  2. गाजर किसुन १
  3. कांदा किसून १
  4. शिमला मिरची १ चीरुन
  5. लिंबूरस १ चमचा
  6. मक्याचे पीठ २ चमचे
  7. आले लसूण मिरची पेस्ट २ चमचे
  8. धणे जीरे पावडर १ चमचा
  9. काळीमीरी पावडर पाव चमचा
  10. तिखट मीठ हळद
  11. मैदा अर्धी वाटी
  12. तांदूळपीठ अर्धीवाटी
  13. गव्हाच्या किंवा बाॅम्बीनो शेवया १ वाटी
  14. पनीर पाव वाटी
  15. तळणीसाठी तेल
  16. कोथिंबीर एकवाटी चीरून
  17. पाणी

सूचना

  1. एका ताटात ऊकडलेले बटाटे कुस्करुन घ्या
  2. त्यात कांदा,गाजर,शिमला मीरची,घाला
  3. आले लसूण मिरची पेस्ट व तिखट मीठ हिंग हळद आणि धणेजिरे पावडर व काळीमीरी पावडर घाला
  4. लिंबू रस व कोथिंबीर आणि २ चमचे काॅर्न फ्लॉवर घालून मळा
  5. आता ह्याचे लहान वडे थापून नेस्ट चा आकार दया व बाजूस ठेवा
  6. आता मैदा व तांदूळपीठ व मीठ घालून अर्धीवाटी पाणी घालून पेस्ट तयार करा
  7. आता तयार केलेला वडा ह्या पेस्ट मध्ये घोळवून मग त्याला शेवया लावा
  8. शेवया नीट सगळी कडून लावा
  9. आता हे तेलात डीप फ्राय करा
  10. आता ताटात पनीर व हलके मीठ घालून छान मळून घ्या व लहान अंडी बनवा
  11. तळलेल्या नेस्टवर कोथिंबीर घालून हि पनीरची अंडी त्यावर ठेवा
  12. तिखट चटणी किंवा साॅस सोबत खाऊ घाला

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Jun-30-2018
Ujwala Nirmale   Jun-30-2018

Wow

Madhavi Loke
Jun-29-2018
Madhavi Loke   Jun-29-2018

Ummmnaa

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर