अचारी चिरोटे | Pickle Chirote Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  29th Jun 2018  |  
4.7 from 3 reviews Rate It!
 • Pickle Chirote recipe in Marathi,अचारी चिरोटे, Nayana Palav
अचारी चिरोटेby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

6

3

अचारी चिरोटे recipe

अचारी चिरोटे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pickle Chirote Recipe in Marathi )

 • मैदा १ कप
 • गरम तूप १ टेबलस्पून
 • सैंधव १/२ टीस्पून
 • चाट मसाला १/४ टीस्पून
 • लोणच्याचा मसाला १-२ टेबलस्पून
 • गरम तूप १ टेबलस्पून
 • कॉर्नफ्लार २ टेबलस्पून
 • वितळलेले तूप ३ टेबलस्पून
 • तेल किंवा तूप तळण्यासाठी

अचारी चिरोटे | How to make Pickle Chirote Recipe in Marathi

 1. मैदा चाळून त्यात १ चमचा गरम तूप घाला.
 2. चिमूटभर मीठ व दूध घालून मळा.
 3. जास्त घट्ट नको, २० मिनिटे झाकून ठेवा.
 4. पीठा तून ३ गोळे काढून, ३ पातळ चपाती लाटा.
 5. चपाती लाटताना पीठ लावू नका.
 6. वितळलेले तूप व कॉर्नफ्लार एकत्र करून पेस्ट बनवून घ्या.
 7. आता १ चपाती घ्या, त्यावर पेस्ट पसरून लावा.
 8. आता या चपातीवर दुसरी चपाती ठेवा.
 9. कॉर्नफ्लार पेस्ट लावा.
 10. आता तिसरी चपाती ठेउन पेस्ट लावा.
 11. आता या ३ चपातीची गूंडाळी करा.
 12. ही गुंडाळी सुरीने कापा, अर्धा इंचाचे तुकडे करा.
 13. आता एक तुकडा घेउन, थर असलेली बाजू वर ठेउन हलक्या हाताने पूरी लाटा.
 14. आता कढईत तेल गरम करून हया पुरया मंद आचेवर तळून घ्या.
 15. एक बाजू तळून झाली की दूसरी बाजू पण तळा.
 16. तळताना चिरोटयांवर तेल उडवा, म्हणजे थर(Layers) चांगले दिसतात.
 17. आता हे चिरोटे एका चाळणीत ठेवा, तेल निथळून जाईल.
 18. आता लोणच्याचा मसाला चिरोंटयावर भुरभरवा (Sprinkle).
 19. तयार आहे तुमचे चटकदार अचारी चिरोटे.

Reviews for Pickle Chirote Recipe in Marathi (3)

Poonam Nikam5 months ago

wow
Reply

Manasvi Pawar5 months ago

Mast
Reply

deepali oak5 months ago

Sundar
Reply