Photo of Sweet shankh by Smita Koshti at BetterButter
1290
2
0.0(1)
0

Sweet shankh

Jun-29-2018
Smita Koshti
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी मैदा
  2. चिमूटभर मीठ
  3. तूप तळण्यासाठी
  4. दूध किंवा पाणी
  5. 1/2 वाटी साखर

सूचना

  1. मैदा गाळून त्यात 2 चमचे तूप, मीठ, व दूध किंवा पाणी घालून चांगले घट्ट मळून घ्या व 10 मिनिटे ओल्या स्वच्छ सूती कपड्याने झाकून ठेवा.कपडा घट्ट पिळलेला हवा
  2. नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे सगळे छोटे गोळे तयार करून घ्या
  3. ही एक लाकडी फळी आहे हिला शंखपट्टी असेही म्हणतात.
  4. मैद्याची छोटी गोळी घेऊन दाब देऊन शंख बनवून घ्या.
  5. व फोटो मधे दाखवल्या प्रमाणे शंख बनवून घ्या .
  6. सगळे शंख बनवून झाल्यानंतर तूप गरम करून मंद आंचेवर शंख तळून घ्या
  7. सगळे शंख तळून झाल्यावर पाक करायला घ्या .साखर व अर्धी वाटी पाणी घालून चांगला गोळीबंद पाक करून घेणे
  8. व गरम गरम पाक शंखावर एका चमच्याने ओतत जाणे व दुसर्‍या चमच्याने शंख हलवत रहावे जेणेकरून पाक सगळीकडे व्यवस्थित लागेल
  9. आपले शंख तयार.. हवाबंद डब्यात भरून ठेवणे व हवे तेव्हा खायला घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर