ब्रेड पनीर रोल | Bread Paneer roll Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bread Paneer roll recipe in Marathi,ब्रेड पनीर रोल, Teesha Vanikar
ब्रेड पनीर रोलby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

6

0

ब्रेड पनीर रोल recipe

ब्रेड पनीर रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread Paneer roll Recipe in Marathi )

 • 1कांदा
 • 150 ग्रँ. पनीर
 • 6/7 ब्रेड स्लाईस
 • 1चमचा आल लसुण पेस्ट
 • 1 टि.स्पु धणे पुड
 • 1टि.स्पु मिर्ची पावडर
 • 1/2 टि.स्पु हळद
 • 1टि.स्पु गरम मसाला
 • 2चमचे कोथिंम्बीर
 • 2 हिरव्या मिर्च्या
 • मिठ
 • तळायला तेल

ब्रेड पनीर रोल | How to make Bread Paneer roll Recipe in Marathi

 1. आधी पनिर स्मँश करुन घेतले
 2. कांदा बारीक कापुन घेतला
 3. कढई गरम झाल्यावर त्यात ,1चमचा तेल घालुन जीरे घातले
 4. जीरे लालसर झाल्यावर त्यात कांदा घालून आल लसुण पेस्ट घातली
 5. कांदा गुलाबी झाल्यावर आच मंद करुन त्यात सर्व सुक्के मसाले घातले
 6. 3मी. चमच्याने मिक्स करून नंतर पनीर व 2चमचे ब्रेडक्रब्स घातले
 7. भाजी 5 मी. झाकण ठेऊन वाफवुन घेतली व 5 मी.नंतर गँस बंद केला
 8. दुसर्या कढईत तेल गरम करायला ठेवले
 9. ब्रेड घेवुन तो पाण्यात डिप करुन लगेच हाताने प्रेस करुन त्यातले पाणी काढुन घेतले
 10. व त्यात चमचाभर पनीर भुर्जी घालुन त्या च्या कडा हातानेच बंद करुन रोल केला
 11. ह्याचप्रमाणे सर्व रोल करुन घेतले
 12. तेल तापल्यावर सावकाश तयार रोल गोल्डन ब्राऊन होईपर्यन्त तळुन घेतले
 13. टोमँटो साँससोबत गरमा गरम ब्रेड पनीर रोल खायला रेडी

My Tip:

ब्रेड क्रब्समुळे पनीरच्या सारणाला बाईंडीग मिळते व भुर्जी ओलसर रहात नाही

Reviews for Bread Paneer roll Recipe in Marathi (0)