गोड शंख | Sweet shankh Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sweet shankh by Smita Koshti at BetterButter
गोड शंखby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

6

0

गोड शंख recipe

गोड शंख बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet shankh Recipe in Marathi )

 • 1 वाटी मैदा
 • 1/2 वाटी साखर
 • चिमूटभर मीठ
 • दूध
 • पाणी
 • तुप तळण्यासाठी

गोड शंख | How to make Sweet shankh Recipe in Marathi

 1. सर्वात आधी मैदा मीठ 2 चमचे तूप व दूध किंवा पाणी घालून चांगले घट्ट मळून घ्या. ओला घट्ट पिळलेला सूती कपडा त्यावर झाकून 5 ते 10 मिनिटे ठेवून द्या.
 2. आता हा गोळा पुन्हा एकदा मळून त्याचे छोटे गोळे तयार करून घ्या
 3. चित्रात दाखविल्याप्रमाणे त्याचे शंख तयार करावेत सोबतच तळणासाठी तूपही तापत ठेवावे.
 4. ह्या लाकडी फळीला शंखपट्टी म्हणतात. शंख करताना व्यवस्थित दाब द्यावा म्हणजे शंख जाड राहणार नाहीत.
 5. असे सर्व शंख तयार करावेत. सवयीने हे भराभर जमतात. मुलांचे तर हे आवडीचे काम .
 6. आता तूप चांगले तापल्यावर थोडे शंख टाकून मंद आचेवर छान खरपूस,सोनेरी गुलाबी तळून घ्या. त्याची सुरसुर थांबेपर्यंत.
 7. असे सगळे शंख तळून घ्या. दुसर्‍या भांड्यात साखर व अर्धी वाटी पाणी घालून चांगला गोळीबंद पाक करून घेणे.
 8. हा गरम पाक एका चमच्याने शंखांवर ओतत जाणे व दुसर्‍या चमच्याने शंख हलवत रहावे जेणेकरून पाक सगळीकडे व्यवस्थित लागेल.
 9. झाले आपले शंख तयार.. हवाबंद डब्यात भरून ठेवणे व हवे तेव्हा खायला घ्या.

My Tip:

विकतच्या मैद्याऐवजी घरीच गव्हाचा(थोडा वेळखाऊ व कंटाळवानं असलं तरी) रवा मैदा पाडून बनवणे. चव अप्रतिम येते व पौष्टिक.

Reviews for Sweet shankh Recipe in Marathi (0)