मेवाडी कढी कचोरी | Mewari kadhi kachori Recipe in Marathi

प्रेषक Garima Yadav  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mewari kadhi kachori recipe in Marathi,मेवाडी कढी कचोरी, Garima Yadav
मेवाडी कढी कचोरीby Garima Yadav
 • तयारी साठी वेळ

  5

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मेवाडी कढी कचोरी recipe

मेवाडी कढी कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mewari kadhi kachori Recipe in Marathi )

 • कढी तयार करण्याचे साहित्य-
 • 1 कप दही
 • 1 टेबल स्पून बेसन
 • 1 टेबल स्पून तेल
 • 1/4 टीस्पून हिंग पावडर
 • 1/2 टीस्पून जिरे
 • 1 टीस्पून बारीक केलेले लसूण
 • 1/4 टीस्पून मोहरी
 • 1/2 टीस्पून मेथी दाणे
 • 1/2 टीस्पून धणे
 • 2-3 बारीक केलेले लवंग
 • 7-8 कडीपत्ता
 • 3-4 संपूर्ण लाल मिरची
 • 1/4 टीस्पून हळद पावडर
 • 1/2 टीस्पून धणे पावडर
 • चवीनुसार मीठ
 • कचोरी चे पिठ साठी साहित्य-
 • 1 कप मैदा
 • 2 टेबल स्पून तूप
 • चवीनुसार मीठ
 • कचोरी स्टफिंग साठी साहित्य-
 • 1/2 कप मूग डाळ (4-5 तास पाण्यात भिजविलेले)
 • 1 टेबल स्पून तेल
 • 1/4 टीस्पून हिंग
 • 1 टीस्पून धणे(संपूर्ण)
 • 1/2 टीस्पून काळी मिरी ( बारीक दळलेली)
 • 1/4 टीस्पून जिरे
 • 1 टेबलस्पून आल-हिरव्या मिरच्या पेस्ट
 • 1 टीस्पून लाल तिखट पावडर
 • 1/4 टीस्पून हळद पावडर
 • 2 टेबल स्पून बेसन
 • चवीनुसार मीठ
 • 1/4 टीस्पून गरम मसाला
 • 1 टीस्पून आमसूल पावडर
 • तळण्यासाठी तेल

मेवाडी कढी कचोरी | How to make Mewari kadhi kachori Recipe in Marathi

 1. कढी तयार करण्याची पद्धती-
 2. दही मध्ये बेसन, तिखट पावडर,हळद पावडर,धणे पावडर, मीठ आणि 1 1/2 कप पाणी घालून चांगले मळून घ्यावे व घोल तयार करा.
 3. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग,मेथी दाणे, लवंग, लसूण, संपूर्ण लाल तिखट, कडीपत्ता आणि संपूर्ण धणे घालून फोडणी द्यावी.
 4. आता यामध्ये घोल टाका आणि उकळून पर्यंत एक सारखें हालवत रहा, नंतर मंद आचेवर 8-10 मिनिटे शिजवा.
 5. कचोरी चे पिठ तयार करण्याची पद्धती-
 6. एका भांड्यात मैदा, तूप आणि मीठ टाका व आवश्यकतेनुसार पाणी घालून नरम पिठ तयार करा आणि तयार पिठ 15 मिनिटे झाकून ठेवा.
 7. कचोरी स्टफिंग करण्याची पद्धती-
 8. कढईत तेल गरम करा त्या जिरे, हिंग, संपूर्ण धणे व काळी मिरी घालून फोडणी द्यावी.
 9. नंतर मूग डाळ घालून 2-3 मिनिटे शिजवा नंतर त्यात आल-हिरव्या मिरच्या पेस्ट, तिखट, हलद पावडर, मीठ आणि 1/4 कप पाणी घाला आणि कढईवर झाकण ठेवून, पाणी आटून जाई पर्यंत शिजवा.
 10. नंतर बेसन, गरम मसाला आणि आमसूल पावडर घाला व चांगले मिसळा, गैस बंद करा.
 11. आत गैस वर कढई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
 12. पीठ चे 6 बरोबर तुकडे करा आणि, गोले तयार करून पुरीच्या आकाराचे लाटा व त्यात स्टफिंग भरा व चारही बाजूने काठ एकत्र करून दाबून बंद करा.
 13. नंतर हलक्या हाताने 3-4 इंच व्यासाच्या गोल आकारात लाटा आणि तळुन घ्यावे.
 14. तयार कचोरी गरम कढी बरोबर खाण्यास ध्या.

Reviews for Mewari kadhi kachori Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo