मुख्यपृष्ठ / पाककृती / वरण बट्टी (खानदेशी प्रकार)

Photo of Dal Batti(Khandesi style) by archana chaudhari at BetterButter
3260
3
0.0(0)
0

वरण बट्टी (खानदेशी प्रकार)

Jun-29-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरण बट्टी (खानदेशी प्रकार) कृती बद्दल

खान्देशात केला जाणारा खूप प्रसिद्ध असणारा हा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. बट्टी च्या पिठासाठी
  2. गहू 4 वाट्या
  3. मक्याचे दाणे 1 वाटी
  4. बट्टी बनवण्यासाठी
  5. बट्टी चे जाडसर दळलेले पीठ 2 वाट्या
  6. हळद 1 चमचा
  7. इनो सोडा 1/2 चमचा
  8. तेल 1 मोठा चमचा
  9. ओवा 1/2 चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. गहू आणि मका गिरणीतून जाडसर दळून आणावे.
  2. आता जाडसर दळलेले पीठ, मीठ,हळद,इनो सोडा,ओवा,तेल एकत्र करून पाणी टाकून भिजवून घेणे.
  3. कणकेसारखेच भिजवा.
  4. त्याचे लंब गोलाकार गोळे करून घ्या.
  5. कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात बट्या ठेवा.
  6. 4 शिट्या देऊन शिजवून घ्या.
  7. कुकर गार झाल्यावर बट्या बाहेर काढा.
  8. थोड्या गार झाल्यावर गोल गोल चकत्या कापा.
  9. ह्या चकत्या तेलात खरपूस तळून घ्या.
  10. तुरीच्या डाळीचे वरण आणि वांग्याच्या घोटलेल्या भाजीसोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर