हेल्दी मॅट समोसा | Healthy mat samosa Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  30th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Healthy mat samosa recipe in Marathi,हेल्दी मॅट समोसा, Shilpa Deshmukh
हेल्दी मॅट समोसाby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

11

2

हेल्दी मॅट समोसा recipe

हेल्दी मॅट समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Healthy mat samosa Recipe in Marathi )

 • स्टफिंगसाठी साहित्य
 • बटाटे 4
 • कांदा 1 चिरून
 • तेल 1 tbs
 • अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
 • सोप 1/2 tbs
 • मिरची पावडर 1 tbs
 • हळद 1/2 tbs
 • आमचूर पावडर 1/2 tbs
 • साखर 1/2 tbs
 • कोथिंबीर चिरून 2 tbs
 • गरम मसाला 1/2 tbs
 • मीठ चवीनुसार
 • आवरणासाठी
 • मैदा 2 कप
 • बिट रस 1/4 कप
 • पालक प्युरी 1/4 कप
 • ओवा 1 tbs
 • 2 tbs तेल मोहन
 • तेल तळण्यासाठी
 • मीठ चिमूटभर चवीसाठी

हेल्दी मॅट समोसा | How to make Healthy mat samosa Recipe in Marathi

 1. बटाटे बॉईल करा थंड करून मॅश करा
 2. कढईत तेल टाका तेल तापलं कि अद्रक लसूण पेस्ट घाला थोडं परतवून कांदा घाला
 3. कांदा गुलाबी झाला मी मॅश बटाटे घाला
 4. तिखट हळद मीठ गरम मसाला साखर आमचूर पावडर घालून छान मिक्स करून घ्या.
 5. कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
 6. पालक 2 मिनिट उकळत्या पाण्यात टाका .थोडं नरम पडलं कि थंड पाण्यात टाका आणि मग नुसता पालक घेऊन मिक्सरला फिरवा.
 7. बीटची . वरची साल काढून छोटे तुकडे करून शिजवून घ्या
 8. थंड करून थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्या.
 9. परातीत मैदा गाळून घ्या ओवा,मीठ आणि मोहन 2 tbs तेल घालून निट मिक्स करून घ्या .तेलामुळे मैदा ओलसर झाल्यासारखा दिसेल म्हणजे समोसा क्रिस्पी होणार .
 10. हा मैदा अर्धा अर्धा दोन बाउल मध्ये काढा .
 11. एका बाऊलमध्ये पालकाची प्युरी हळू हळू घालून पीठ घट्ट मळून घ्या 15 मिनिट झाकून ठेवा.
 12. दुसऱ्या बाऊलमध्ये बीटची प्युरी हळू हळू घालून पीठ घट्ट मळून 15 मिनिट झाकून ठेवा .
 13. लाल आणि हिरवा असे दोन पीठ आपल्याकडे मळून तयार आहे दोन्ही पिठाच्या लिंबाएवढा गोळा घेवून मोठी पोळी लाटा.
 14. चाकूने पोळीचे सर्व कॉर्नरकडून सरळ एका रेषेत कापत आणून चौकोनी आकार द्या
 15. चौकोनी आकाराच्या पोळीचे परत दोन काप करा आणि क्रॉस सारखे ठेवा.
 16. मध्ये चमच्याने भाजी ठेवा आणि लाल पट्टीने भाजीवर फोल्ड करा नंतर हिरव्या पट्टीने फोल्ड करा पाण्याचं बोट लावून चिकटवा म्हणजे भाजी बाहेर येणार नाही .
 17. आता दोन पट्ट्याना सारखे स्ट्रीप सारखे कापा
 18. मॅट विणतो तशी एक बिट ची पट्टी एक पालकाची पट्टी अशाप्रकारे विणत समोसा पॅक करा.
 19. कढईत तेल टाका आणि एका वेळी दोन दोन समोसे तळून घ्या तळताना विशेष काळजी घ्यावी लागते .चमच्याने हळूहळू गरम तेल समोस्यावर टाकावे लागते म्हणजे खालच्या पट्ट्या तळल्या जातील .
 20. दोन्ही बाजूनी पलटवून कमी लो मिडीयम फ्लेम वर समोसे तळून घ्या .
 21. हे रंगीत आणि पौष्टिक समोसे लहान आणि मोठ्याना आकर्षित करतात .
 22. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे समोसे मस्त खुसखुशीत होतात.

My Tip:

तुम्ही सारण तुमच्या आवडीनुसार भरू शकता ,पनीर ,चिकन ,मिक्स व्हेज इत्यादी .

Reviews for Healthy mat samosa Recipe in Marathi (2)

Pranali Deshmukh4 months ago

लाजवाब￰
Reply

tejswini dhopte4 months ago

Wowa
Reply
Shilpa Deshmukh
4 months ago
thanx