BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Healthy mat samosa

Photo of Healthy mat samosa by Shilpa Deshmukh at BetterButter
441
10
5(2)
0

Healthy mat samosa

Jun-30-2018
Shilpa Deshmukh
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • किटी पार्टी
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. स्टफिंगसाठी साहित्य
 2. बटाटे 4
 3. कांदा 1 चिरून
 4. तेल 1 tbs
 5. अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
 6. सोप 1/2 tbs
 7. मिरची पावडर 1 tbs
 8. हळद 1/2 tbs
 9. आमचूर पावडर 1/2 tbs
 10. साखर 1/2 tbs
 11. कोथिंबीर चिरून 2 tbs
 12. गरम मसाला 1/2 tbs
 13. मीठ चवीनुसार
 14. आवरणासाठी
 15. मैदा 2 कप
 16. बिट रस 1/4 कप
 17. पालक प्युरी 1/4 कप
 18. ओवा 1 tbs
 19. 2 tbs तेल मोहन
 20. तेल तळण्यासाठी
 21. मीठ चिमूटभर चवीसाठी

सूचना

 1. बटाटे बॉईल करा थंड करून मॅश करा
 2. कढईत तेल टाका तेल तापलं कि अद्रक लसूण पेस्ट घाला थोडं परतवून कांदा घाला
 3. कांदा गुलाबी झाला मी मॅश बटाटे घाला
 4. तिखट हळद मीठ गरम मसाला साखर आमचूर पावडर घालून छान मिक्स करून घ्या.
 5. कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
 6. पालक 2 मिनिट उकळत्या पाण्यात टाका .थोडं नरम पडलं कि थंड पाण्यात टाका आणि मग नुसता पालक घेऊन मिक्सरला फिरवा.
 7. बीटची . वरची साल काढून छोटे तुकडे करून शिजवून घ्या
 8. थंड करून थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्या.
 9. परातीत मैदा गाळून घ्या ओवा,मीठ आणि मोहन 2 tbs तेल घालून निट मिक्स करून घ्या .तेलामुळे मैदा ओलसर झाल्यासारखा दिसेल म्हणजे समोसा क्रिस्पी होणार .
 10. हा मैदा अर्धा अर्धा दोन बाउल मध्ये काढा .
 11. एका बाऊलमध्ये पालकाची प्युरी हळू हळू घालून पीठ घट्ट मळून घ्या 15 मिनिट झाकून ठेवा.
 12. दुसऱ्या बाऊलमध्ये बीटची प्युरी हळू हळू घालून पीठ घट्ट मळून 15 मिनिट झाकून ठेवा .
 13. लाल आणि हिरवा असे दोन पीठ आपल्याकडे मळून तयार आहे दोन्ही पिठाच्या लिंबाएवढा गोळा घेवून मोठी पोळी लाटा.
 14. चाकूने पोळीचे सर्व कॉर्नरकडून सरळ एका रेषेत कापत आणून चौकोनी आकार द्या
 15. चौकोनी आकाराच्या पोळीचे परत दोन काप करा आणि क्रॉस सारखे ठेवा.
 16. मध्ये चमच्याने भाजी ठेवा आणि लाल पट्टीने भाजीवर फोल्ड करा नंतर हिरव्या पट्टीने फोल्ड करा पाण्याचं बोट लावून चिकटवा म्हणजे भाजी बाहेर येणार नाही .
 17. आता दोन पट्ट्याना सारखे स्ट्रीप सारखे कापा
 18. मॅट विणतो तशी एक बिट ची पट्टी एक पालकाची पट्टी अशाप्रकारे विणत समोसा पॅक करा.
 19. कढईत तेल टाका आणि एका वेळी दोन दोन समोसे तळून घ्या तळताना विशेष काळजी घ्यावी लागते .चमच्याने हळूहळू गरम तेल समोस्यावर टाकावे लागते म्हणजे खालच्या पट्ट्या तळल्या जातील .
 20. दोन्ही बाजूनी पलटवून कमी लो मिडीयम फ्लेम वर समोसे तळून घ्या .
 21. हे रंगीत आणि पौष्टिक समोसे लहान आणि मोठ्याना आकर्षित करतात .
 22. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे समोसे मस्त खुसखुशीत होतात.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pranali Deshmukh
Jul-01-2018
Pranali Deshmukh   Jul-01-2018

लाजवाब￰

tejswini dhopte
Jun-30-2018
tejswini dhopte   Jun-30-2018

Wowa

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर