शेवग्याच्या शेंगांची भजी | DRUMSTIK PAKODA Recipe in Marathi

प्रेषक Nutan Sawant  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • DRUMSTIK PAKODA recipe in Marathi,शेवग्याच्या शेंगांची भजी, Nutan Sawant
शेवग्याच्या शेंगांची भजीby Nutan Sawant
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शेवग्याच्या शेंगांची भजी recipe

शेवग्याच्या शेंगांची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DRUMSTIK PAKODA Recipe in Marathi )

 • दोन शेवग्याच्या जून शेंगा
 • एक वाटी बेसन
 • दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ
 • एक चहाचा चमचा लाल मिरचीपूड
 • अर्धा चहाचा चमचा हळदपूड
 • पण चहाचा चमचा हिंग
 • चवीनुसार मीठ
 • अर्धा चमचा साखर
 • तळण्यासाठी तेल

शेवग्याच्या शेंगांची भजी | How to make DRUMSTIK PAKODA Recipe in Marathi

 1. शेंगा जर जास्त तासा,हिरवा भाग पूर्ण काढून टाका.
 2. नेहमीसारखे बोटाइटके तुकडे करा
 3. थोडेसे मीठ घालून उकडून घ्या.
 4. थंड झाल्यावर बिया काढून,एक तुकड्याची तीन तुकडे करा.
 5. बेसनात,तांदुळपीठ, हिंग,हळद,मिर्चीपूड,मीठ,साखर घालून घोळ तयार करा
 6. तेल तापवून,तुकडे बेसनाच्या घोळात बुडवून तळून घ्या.
 7. कोणतीही चटणी किंवा टोमाटो सोससोबत आस्वाद घ्या.

Reviews for DRUMSTIK PAKODA Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo