कारंदीचे कटलेट्स | SHRIMP CUTLETS Recipe in Marathi

प्रेषक Nutan Sawant  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • SHRIMP CUTLETS recipe in Marathi,कारंदीचे कटलेट्स, Nutan Sawant
कारंदीचे कटलेट्सby Nutan Sawant
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

कारंदीचे कटलेट्स recipe

कारंदीचे कटलेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SHRIMP CUTLETS Recipe in Marathi )

 • दीड वाटी उकडलेला बटाटा स्मॅश करून
 • एक वाटी सोललेली करंदी
 • अर्धी वाटी ब्रेडक्रम्ब
 • एक चमचा आलेपेस्ट
 • एक चहाचा चमचा लसूण पेस्ट
 • एक चहाच चमचा लाल मिरचीपूड
 • अर्धा चहाचा चमचा गरम मसाला
 • अर्धा चहाचा चमचा हळदपूड
 • अर्धा चहाचा चमचा आमचूर
 • अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
 • अर्धी वाटी रवा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

कारंदीचे कटलेट्स | How to make SHRIMP CUTLETS Recipe in Marathi

 1. करंदीला आले लसूण पेस्ट चोळून दहा मिनिटे ठेवा.
 2. रवा आणि तेल वगळून बाकी सर्व साहित्य एकत्र करून त्यात करंदी,हलक्या हाताने मिसळा.
 3. मोठ्या लिंबाइतके गोळे करून पाण्याच्या हाताने हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा.
 4. रव्यात घोळवून शॅलो किंवा एअर फ्राय करा.
 5. कोणतंही चटणी किंवा सोससोबत आस्वाद घ्या.

My Tip:

मी एअर फ्यायरमध्ये केले अगदी अर्धाचमचा तेल पुरते.

Reviews for SHRIMP CUTLETS Recipe in Marathi (0)